बुध मार्गी: ६ राशींवर लक्ष्मी नारायण कृपा, करिअरचा आलेख वाढेल; गुप्तधनाचे योग, सुख-समृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 07:07 AM2024-01-03T07:07:07+5:302024-01-03T07:07:07+5:30

बुधाचे मार्गी होणे आणि लक्ष्मी नारायण योग काही राशींना समृद्धीदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

नववर्षाच्या सुरुवातीला ज्योतिषशास्त्रानुसार अनेक घटना घडत आहेत. मेष राशीत गुरू ग्रह मार्गी झाला आहे. यानंतर छाया ग्रह मानले गेलेले राहु आणि केतु यांनी नक्षत्र परिवर्तन केले आहे. यानंतर आता नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह वृश्चिक राशीत मार्गी होत आहे. डिसेंबर महिन्यात बुध ग्रहाने वक्री चलनाने धनु राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला होता.

०२ जानेवारी रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीत मार्गी झाला आहे. या राशीत विद्यमान स्थितीत शुक्र ग्रह विराजमान आहे. शुक्र आणि बुध या ग्रहांच्या संयोगयुतीने लक्ष्मी नारायण नामक शुभ मानला गेलेला योग जुळून येत आहे. हा एक राजयोगही मानला गेला आहे. शुक्र आणि बुध दोन्ही ग्रह मार्गी चलनाने वृश्चिक राशीत असतील.

वृश्चिक राशीत बुधाचे मार्गी होणे महत्त्वाचे मानले गेले आहे. बुध मार्गी झाल्याचा शुभ प्रभाव ६ राशींवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. आगामी काळात या राशींना करिअर, बिझनेस, नोकरी यासह जीवनातील अन्य क्षेत्रात यश-प्रगती साध्य करता येऊ शकेल. धनलाभ होऊ शकेल. लक्ष्मी नारायण कृपेने सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: या राशीपासून सातव्या स्थानी बुध मार्गी झाला असून, राशीस्वामी शुक्रासह लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे. प्रेम जीवन रोमँटिक असेल. कमाईने आणि कामाच्या ठिकाणी प्रगतीने आनंदी व्हाल. कला आणि व्यवसाय क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर आहे. महिला सहकारी आणि मैत्रिणींकडूनही लाभ आणि पाठिंबा मिळेल. परदेश दौऱ्याची योजना आखू शकाल. त्यात यश मिळू शकेल.

कर्क: बुधाचे मार्गी होणे लाभदायक ठरू शकेल. शुभ लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे शैक्षणिक आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांचा कल शिक्षणाकडे वाढेल. कला क्षेत्राशी निगडित लोकांच्या कलागुणांमध्ये सुधारणा होईल. स्पर्धेत अनुकूल परिणाम मिळतील. संततीकडून विशेष आनंद आणि सहकार्य मिळेल.

सिंह: बुध आणि शुक्राचा लक्ष्मी नारायण योगामुळे लाभ, सुख प्राप्त होईल. आनंदी राहाल. प्रलंबित आणि महत्त्वाची कामे यशस्वी होतील. पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वडिलांकडून लाभ मिळेल. आईसोबतचे नाते आनंददायी होईल. व्यवसायात चांगले पैसे मिळतील. अडकलेले पैसे किंवा गुप्त धन मिळण्याची शक्यता आहे. वाहनाचे सुख मिळण्याचीही शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या: बुध मार्गी आणि लक्ष्मी नारायण योगाचा काळ लाभदायक ठरू शकेल. धाडस, उत्साह आणि बुद्धिमत्ता यामुळे कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी प्रयत्न अधिक तीव्र करावेत यश मिळेल. मित्र आणि पूर्वीच्या ओळखीच्या व्यक्तींद्वारे लाभ मिळू शकतात. गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. कौटुंबिक संबंध मधुर आणि प्रेमळ राहतील.

वृश्चिक: खूप फायदा होऊ शकेल. व्यापारी वर्गाला व्यवसायात भरपूर नफा आणि प्रगती होईल. कलात्मक आवड वाढणार आहे, जी प्रत्येक क्षेत्रात दिसेल. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. प्रेम जीवनात प्रियकरासह रोमँटिक क्षण घालवाल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल. व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

मीन: नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. लाभ मिळेल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. तीर्थयात्रेची संधी मिळू शकते. कुटुंबात शुभ कार्ये आयोजित करता येतील. संततीकडून लाभ आणि आनंद मिळू शकेल. वडील आणि वडिलोपार्जित संपत्ती सुखकारक ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.