१ महिना बुध २ राशी बदलणार! ‘या’ ४ राशींना वरदान काळ; उत्तम संधी अन् महिनाभर लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:29 AM2022-11-23T11:29:45+5:302022-11-23T11:34:35+5:30

डिसेंबर महिन्यात बुध दोनवेळा राशीपरिवर्तन करणार असून, याच महिन्यात वक्रीही होणार आहे. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध आताच्या घडीला वृश्चिक राशीत विराजमान आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बुध रास बदलून धनु राशीत जाणार आहे. इतकेच नाही, तर डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात बुध धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. (mercury transit in december 2022)

डिसेंबर महिन्यातील बुध ग्रहाच्या चलनाचे आणखी एक विशेष म्हणजे बुध वक्री होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी बुध वक्री होऊन पुन्हा धनु राशीत प्रवेश करेल. (budh gochar in december 2022)

डिसेंबरमध्ये बुधाचे संक्रमण अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बुध धनु राशीत, नंतर मकर राशीत प्रवेश करेल आणि वक्री चलनाने पुन्हा धनु राशीत येईल. अशा स्थितीत या दोन राशींमध्ये भ्रमण करत असताना बुध लाभ देईल.

बुधच्या या गोचर आणि वक्री चलनाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकेल. डिसेंबरमध्य लग्नसराई काळात बुधाचे संक्रमण काही लोकांसाठी खूप भाग्यवान ठरू शकते. या दरम्यान त्यांना त्यांचा इच्छित जीवनसाथी मिळू शकतो. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना काही चांगल्या ऑफर मिळू शकतात. बुधचे संक्रमण तुमच्यासाठी कसे असेल? जाणून घ्या...

मेष राशीच्या लोकांना या महिन्यात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही शिक्षक, सल्लागार किंवा कोणत्याही तांत्रिक क्षेत्राशी संबंधित असाल तर काही चांगल्या आणि नवीन संधी येऊ शकतात. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत होते, त्यांनाही यश मिळू शकते. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. तीर्थयात्रेला जाण्याची योजनाही बनवता येईल. भावंडांशी संबंध सुधारतील. शक्य असल्यास दररोज तुळशीला पाणी देणे उपयुक्त ठरू शकेल.

वृषभ राशीच्या लोकांनाही या महिन्यात बुधाच्या संक्रमणामुळे विशेष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. विज्ञान आणि संशोधन कार्याशी निगडीत आहेत, त्यांचे रखडलेले प्रकल्प या महिन्यात पूर्ण होऊ शकतात. परिश्रमाचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. संतुलित आणि हलका सकस आहार घेणे उपयुक्त ठरू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींची अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. जे चांगल्या जोडीदाराच्या शोधात होते, त्यांचा शोध पूर्ण होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नुकसानभरपाईतून तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हे संक्रमण विशेष फायदेशीर ठरू शकेल. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळू शकते.

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे गोचर विशेष आनंद देणारे आहे. कुटुंबातील तुमचे संबंध दृढ होतील आणि कुटुंबासोबत सुट्टीवरही जाऊ शकता. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजनाही पूर्ण होऊ शकते. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगली वेळ आहे. गुंतवणूक तुम्हाला भविष्यात नफा देईल. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यात यश मिळू शकेल.

इंग्रजी वर्षाच्या शेवटच्या डिसेंबर महिन्यात सूर्य बुध आणि शुक्र ग्रहांच्या संयोगामुळे अनेक शुभ योग जुळून येत आहेत. याचा अनेक राशींना उत्तम लाभ होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.