३० दिवस लाभ! ६ राशींना सुवर्ण काळ, यश-प्रगतीची संधी; गुंतवणुकीत फायदा, बुध गोचर शुभ ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:55 AM2023-11-21T09:55:55+5:302023-11-21T10:02:45+5:30

नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा बुध राशीपरिवर्तन करणार आहे. काही राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अतिशय सकारात्मक, लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह तूळ राशीतून वृश्चिक राशीत विरामान झाला. वृश्चिक राशीत सूर्य आणि बुधाचा बुधादित्य नामक शुभ राजयोग जुळून आला आहे. तसेच सूर्य, बुध आणि मंगळाचा त्रिग्रही योग जुळून आला आहे. यानंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस २७ तारखेला बुध ग्रह पुन्हा एकदा राशीपरिवर्तन करून धनु राशीत प्रवेश करणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बुध ग्रहाने धनु राशीत प्रवेश केल्यानंतर १३ डिसेंबर रोजी बुध वक्री होणार आहे. वक्री चलनाने बुध पुन्हा वृश्चिक राशीत येणार आहे. २८ डिसेंबरपर्यंत बुध वक्री असेल. त्यानंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत मार्गी होणार आहे. बुध ग्रहाचा धनु राशीतील प्रवेश, वक्री होऊन वृश्चिक राशीत येणे आणि याच राशीत मार्गी होणे काही राशींसाठी लाभदायक मानले जात आहे.

प्रेरणा, ज्ञान, सौभाग्य, शहाणपण, मार्गदर्शन यांचा कारक मानल्या गेलेल्या बुध ग्रहाचे राशीपरिवर्तन देश-दुनियेसह सर्व राशींवर प्रभाव पाडणारे असते, असे सांगितले जाते. मात्र, काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुध गोचराचा अतिशय शुभ, सकारात्मक प्रभाव दिसू शकतो. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना बुध गोचर शुभ परिणामकारक ठरू शकेल. वाणी, बोलणे प्रभावशाली असेल. चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. अनेक खास लोक भेटतील. धार्मिक कार्यात रस असेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुध गोचर अनुकूल ठरू शकेल. घरात काही धार्मिक कार्यक्रमही होऊ शकतात. वैवाहिक जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. काही मालमत्ता खरेदी करू शकता. संशोधन क्षेत्राशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ फलदायी ठरेल. भागीदारीत व्यवसाय केला तर चांगला नफा मिळू शकेल. आर्थिक स्थितीत सुधारण दिसून येऊ शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुध गोचर यशकारक ठरू शकेल. चांगली प्रगती साधता येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश संपादन करता येईल. शिकण्याची क्षमता वाढेल. विद्यार्थ्यांना फायदा होईल. संवाद कौशल्याच्या आधारे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संबंध मजबूत कराल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यात यशस्वी होऊ शकाल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम कराल.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुध गोचर सकारात्मक ठरू शकेल. सोशल नेटवर्कचा विस्तार करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. घरगुती जीवनात पूर्ण लक्ष द्याल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकतात. कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण करतील. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतील. बुद्धीने सर्व समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल.

धनु राशीच्या व्यक्तींना बुध गोचराचा अनुकूल परिणाम मिळू शकेल. अनेक कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत नवीन घर खरेदी किंवा घराचे नूतनीकरण करण्याचे नियोजन कराल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखाल, जेणेकरून दोन्ही ठिकाणी वेळ देऊ शकाल. जे प्रॉपर्टी एजंट म्हणून काम करतात, त्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतील. संवाद कौशल्य चांगले असेल. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. परदेशात राहणारा एखादा नातेवाईक भेटू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना बुध गोचर फायदेशीर ठरू शकेल. कामाचे कौतुक होईल. आणि सर्वांशी संबंध चांगले राहतील. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर, आरोग्य सुधारेल. पालकांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत नवीन मालमत्ता खरेदी करण्याची योजना यशस्वी होईल. आर्थिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.