३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:51 AM2024-09-25T10:51:15+5:302024-09-25T11:03:32+5:30

३ ग्रह स्वराशीत असून, यामुळे काही राजयोग जुळून येत आहेत. याचा अनेक राशींना होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात अनेक शुभ योग जुळून येत आहे. बुध ग्रहाने स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश केला आहे. या राशीत सूर्य आणि केतु विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. तसेच केतुसोबत युती योग जुळून येत आहे. तसेच कन्या राशीतच सूर्य, बुध आणि केतु यांचा त्रिग्रही योग जुळून आलेला आहे.

बुध कन्या राशीत आल्याने भद्र नामक राजयोग जुळून येत आहे. तसेच शुक्र ग्रह स्वराशीत म्हणजेच तूळ राशीत आहे. त्यामुळे मालव्य नामक राजयोग जुळून येत आहे. याशिवाय नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. त्यामुळे शश नामक राजयोग जुळून आला आहे.

बुध, शुक्र आणि शनी स्वराशीत आहे. त्यामुळे भद्र, मालव्य आणि शश नामक राजयोग जुळून आले आहेत. याचा लाभ काही राशींना होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. व्यवसाय, व्यापार, नोकरी, कुटुंब, आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैशांमुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यास उत्सुक असलेले लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतील. नोकरी करत आहेत आणि प्रमोशनच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनाही या काळात फायदा होऊ शकेल. करिअरमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्या लहान भावंडांची मदत घेऊ शकतात. याचा फायदा होऊ शकेल.

मिथुन: तीन राजयोग अनुकूल ठरू शकतात. नशिबाची मजबूत साथ लाभू शकते. भौतिक सुखे लाभू शकतात. यावेळी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच, मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात.

कन्या: आर्थिक परिस्थिती बदलत असल्याचे दिसून येऊ शकेल. तीन राजयोगांचा लाभही मिळेल. चांगली बातमी येऊ शकते. परदेशातून फायदा होऊ शकतो. त्याच वेळी, पैसे किंवा व्यवसायाशी संबंधित अशा बातम्या मिळू शकतात, ज्याचा भविष्यात नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे.

तूळ: नवीन व्यावसायिक संकल्पना फायदेशीर ठरू शकतात. वित्त क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांचा काळ चांगला ठरू शकेल. मनात नवीन विचार येतील. नवीन कल्पनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात असे अनेक सौदे मिळू शकतात, ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरदारांची प्रगती होईल. नोकरीच्या अनेक ऑफर मिळू शकतात.

धनु: तीन राजयोग लाभाचे ठरू शकतात. धाडसात आणि शौर्यामध्ये वाढ झालेली दिसेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. या काळात उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, कौटुंबिक जीवन आनंदी होईल आणि समृद्धी लाभू शकेल.

मकर: तीन राजयोग फायदेशीर ठरू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात नशीबही तुमच्या बाजूने असेल.

कुंभ: ज्या कामासाठी इतके दिवस मेहनत करत होता ते यशस्वी होऊ शकतात. उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांचा फायदा होईल. चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी येऊ शकते. शहाणपणाने निर्णय घेतल्यास इच्छित नोकरी मिळवण्यात यश मिळेल. व्यवसायातही अनेक नवीन सौदे मिळण्याची शक्यता आहे.

मीन: वडिलोपार्जित संपत्तीसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. परस्पर संमतीने वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्याचा मार्ग शोधता येईल. नोकरदारांच्या पगारात वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक करायची असेल, तर गुंतवलेल्या पैशातून दुप्पट फायदा मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.