बुध उदय: ७ राशींवर सकारात्मक प्रभाव, जीवनात यश; पैशांची बचत शक्य, सुखाचा, आनंदाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:13 PM2024-06-26T15:13:00+5:302024-06-26T15:13:00+5:30

बुध उदय होणे म्हणजे नेमके काय? कोणत्या राशींना लाभ प्राप्त होऊ शकतो? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध स्वराशीत म्हणजेच मिथुन राशीत विराजमान आहे. या मिथुन राशीत बुध उदय होणार आहे. २७ जून रोजी बुध उदय होणार आहे. यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २९ जून रोजी बुध मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंशांवर असतो, तेव्हा तो ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. पृथ्वीवरून हा ग्रह दिसत नसल्याने या स्थितीला तो ग्रह अस्त पावला, असे समजले जाते. सूर्यापासून दूरच्या अंतरावरून ग्रह मार्गक्रमण करू लागला की, तो ग्रह पृथ्वीवरून दिसतो. त्यामुळे त्या ग्रहाचा उदय झाला, असे सांगितले जाते.

बुध ग्रह उदय होण्याचा काही राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. आर्थिक लाभासह पैशांची बचत करणे शक्य होऊ शकेल. व्यापारी वर्गाला नफा कमवण्याची संधी मिळू शकेल. जाणून घ्या...

वृषभ: प्रयत्नांना यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. पैसे कमावण्यासोबतच तुम्ही बचत करण्यातही यशस्वी होऊ शकाल. परीक्षा, शिक्षणात चांगली कामगिरी कराल.

मिथुन: आनंद वाढेल. नवीन घर खरेदी करू शकता. व्यवसाय आणि नोकरी दोन्ही फायद्याची संधी मिळू शकेल. पैशांची बचत करण्यात यश मिळू शकेल. उत्पन्नाचे अधिक स्रोत असतील.

सिंह: सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी हा काळ चांगला असेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. यशस्वी होऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. नोकरीत तुम्हाला चांगले पद मिळू शकते.

कन्या: संपूर्ण लक्ष कामावर असेल. व्यावसाय, करिअरमध्ये प्रगती होईल. चांगली कमाई अपेक्षित आहे. आर्थिक लाभ मिळू शकतो.

तूळ: सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देण्यास सक्षम असाल. नोकरदारांनी फक्त कामावर लक्ष केंद्रित करावे. करियरमध्ये यश, प्रगती प्राप्त होऊ शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

मकर: लांबचा प्रवास फलदायी ठरेल. नोकरीत प्रगती होईल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकेल. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळू शकेल. काही लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात.

कुंभ: शेअर बाजारातून काही लोकांना फायदा होऊ शकतो. अधिक पैसे कमविण्याची संधी मिळेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.