चैत्र संकष्ट चतुर्थी: राशीनुसार ‘या’ मंत्रांचे जप करा, भरघोस लाभ मिळवा; कोणते उपाय करावेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:06 IST2025-04-15T16:55:59+5:302025-04-15T17:06:55+5:30

Chaitra Sankashti Chaturthi April 2025: तुमची रास कोणती? नेमक्या कोणत्या मंत्राचा जप करावा? कोणते उपाय करणे उपयुक्त ठरू शकेल? जाणून घ्या...

Chaitra Sankashti Chaturthi April 2025: हिंदू नववर्षाचा पहिला चैत्र महिना सुरू आहे. चैत्र संकष्ट चतुर्थी बुधवार, १६ एप्रिल २०२५ रोजी आहे. बुधवारी संकष्टी येणे आणि त्यादिवशी गणपती पूजन करणे हेही विशेष मानले गेले आहे. चैत्र महिन्यात अनेक योग, राजयोग जुळून आले. या शुभ योगांमध्ये व्रत-वैकल्ये असल्याने याचे महत्त्व आणखी वाढले. संकष्ट चतुर्थीलाही मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. तसेच काही राजयोगही जुळून आलेले आहेत.

गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, राशीनुसार संकष्ट चतुर्थीला काही मंत्राचा जप केल्यास किंवा तुमच्या राशीनुसार उपाय केल्यास श्री गणेशाची कृपा लाभू शकते. सुख, समृद्धी, वैभव प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: ॐ हेरंबाय नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच श्री गणेशाला गंगाजलाचा अभिषेक करा. त्यांना लाल चंदन अर्पण करावे.

वृषभ: ॐ श्री निधिये नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच दुधाचा अभिषेक करावा.

मिथुन: ॐ वक्रतुंडाय नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच भगवान श्री गणेशाला बेसनाचे लाडू अर्पण करा.

कर्क: ॐ शंभुपुत्राय नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच गणपतीला दुर्वा अवश्य अर्पण करा.

सिंह: ॐ रक्त वाससाय नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच गणपतीला पंचामृताचा अभिषेक करून लाडवाचा नैवेद्य दाखवावा.

कन्या: ॐ शूर्पकर्णकाय नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच गणपती बाप्पाला चंदन अर्पण करावे.

तूळ: ॐ श्रीमतये नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच गंगाजल किंवा दुधाचा अभिषेक करावा.

वृश्चिक: ॐ अंगारकाय नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच गणेशाला मध आणि दही अभिषेक करताना अर्पण करावे.

धनु: ॐ गणाधिपतये नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच श्री गणेशाला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी.

मकर: ॐ लंबोदराय नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच गणेश पूजनानंतर गणेश चालिसा अवश्य पठण करावी. पठण शक्य नसेल तर श्रवण करावी.

कुंभ: ॐ व्रातपतये नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच गणेश पूजनानंतर दुर्वा अवश्य अर्पण करावी.

मीन: ॐ वरदमूर्तये नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. तसेच गणेश पूजनानंतर खिरीचा नैवेद्य दाखवावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.