३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:05 IST2025-04-23T12:54:00+5:302025-04-23T13:05:52+5:30
Chaitra Varuthini Ekadashi April 2025: गुरुवारी येत असलेली वरुथिनी एकादशी कोणत्या राशींना सर्वोत्तम सुवर्ण संधी, अनुकूलता, सकारात्मकता देणारी ठरू शकेल? जाणून घ्या...

Chaitra Varuthini Ekadashi April 2025: चैत्र महिना सांगतेकडे आला आहे. हिंदू नववर्षाचा पहिला चैत्र महिना अतिशय शुभ मानला जातो. अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव या कालावधीत साजरे केले जातात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रताचरण केले जाते. चैत्र महिन्यातील वद्य पक्षातील एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते.
यंदा, गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी वरुथिनी एकादशी आहे. संपूर्ण वर्षात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य अगदी वेगळे आहे. एकादशी तिथी श्रीविष्णूंना समर्पित असल्याने प्रत्येक एकादशीला श्रीविष्णूंचे पूजन, नामस्मरण, उपासना केली जाते. वरुथिनी एकादशी मोक्षदायी असल्याचे म्हटले जाते.
गुरुवार हा दत्तगुरू आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पूजन, उपासना, नामस्मरणास समर्पित मानला जातो. या एकाच दिवशी श्रीविष्णू, दत्तगुरू, स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याची सर्वोत्तम सुवर्ण संधी आहे. या वरुथिनी एकादशीला मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. ३ राजयोग जुळून आले आहेत. या सर्व ग्रहस्थितीचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकतो? जाणून घेऊया...
मेष: अनेक अडचणी दूर होतील. त्यामुळे हलके वाटेल. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. जवळच्या लोकांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. भाग्याची चांगली साथ राहील. एखादी महत्त्वाची बातमी कानावर पडेल. कामाची प्रशंसा केली जाईल. समाजात तुमचा मान वाढेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. शुक्रवार, शनिवार उत्साहाला थोडा आवर घातला पाहिजे.
वृषभ: यशच यश मिळेल. परंतु, थोडी सबुरी बाळगा. घाईत कामे करू नका. चांगल्या बातम्या कळतील. समाजात मान वाढेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. घरात उत्सवी वातावरण राहील. शुक्रवार, शनिवार लाभ स्थानातील बुध, राहु, शनि, शुक्र, नेपच्यून, चंद्र युतीची चांगली फळे मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील.
मिथुन: उच्च पदस्थ लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यातून कामे होतील. यश मिळेल. नशिबाचा कौल बाजूने राहील. अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात मजेत वेळ जाईल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. उपक्रमांना लोक सहकार्य करतील. कार्यक्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल.
कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. वाद टाळा. कारण नसताना काळजी करणे सोडा. नेहमीची कामे वेळच्या वेळी करा. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात सामान्य परिस्थिती राहील. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शुक्रवार, शनिवार अनुकूल परिस्थिती राहील. सार्वजनिक कार्यात चांगली कामगिरी होईल.
सिंह: लोकांकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींना गोपनीय माहिती देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. चांगले अनुभव येतील. मनात सकारात्मक विचार राहतील. आवडत्या लोकांच्या सहवासात मन रमेल. शुक्रवार, शनिवार अष्टम स्थानातील बुध, शुक्र, शनि, राहु, नेपच्यून आणि चंद्र युतीमुळे थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. इतरांच्या भानगडीत पडू नका.
कन्या: लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. त्यामुळे कामे होतील. नोकरीत नवीन संधीची चाहूल लागेल. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमणामुळे थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. जवळचे समजून एखाद्यावर विश्वास ठेवाल तर अडचणीत याल. महत्त्वाच्या योजना गुप्त ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ: नोकरी व्यवसायात सतत व्यस्त राहाल. कामाचा ताण घेऊ नका. नोकरीत व घरात वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी. लोकांशी गोडीत बोलून कामे करून घ्यावी. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे काम होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. जवळचे प्रवास होतील. शुक्रवार, शनिवार आरोग्याची काळजी घ्यावी. लोकांशी सावधपणे बोला.
वृश्चिक: अनुकूल परिणाम दिसून येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कराल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल.
धनु: भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. पैशांचा ओघ सुरू राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. व्यवसायात भरभराट होईल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. जवळच्या लोकांशी वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी. नोकरीत अनपेक्षितपणे कामाचे स्वरूप बदलेल. त्यामुळे वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. संयम बाळगण्याची गरज आहे.
मकर: नियमानुसार कामे होतील याकडे लक्ष द्यावे. बोलण्यामुळे लोक दुखावले जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. शुभ फळे मिळतील. महत्त्वाची कामे होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. शुक्रवार, शनिवार पराक्रम स्थानात सहा ग्रहांची युती आहे. व्यवसायात सतत व्यस्त राहाल.
कुंभ: अति आत्मविश्वास बाळगू नका. एखादी व्यक्ती बरेच काही शिकवून जाईल. पैसा मिळेल आणि तो खर्च करण्याकडे कल राहील. सावधपणे वागण्याची गरज आहे. अनेक अडचणी दूर होतील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. मात्र, तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
मीन: यशदायक काळ आहे. नवीन संधी मिळेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. प्रलंबित कामे आटोक्यात येतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नातेवाईक व जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. व्यय स्थानातून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे संमिश्र फळे मिळतील. कागदोपत्री पूर्तता करताना खबरदारी घ्यावी. शुक्रवार, शनिवार अडचणी दूर होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.