चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 10:48 AM2024-10-01T10:48:15+5:302024-10-01T10:57:49+5:30

नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असताना अनेक शुभ योग जुळून येत आहेत. कोणत्या राशींना शुभ लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या...

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच विशेष ग्रहस्थितीमुळे काही शुभ योग जुळून आले आहेत. या शुभ योगात घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. नवग्रहांमध्ये चंद्र हा वेगाने मार्गक्रमण करणारा ग्रह मानला जातो. तर शनी सर्वांत मंदगतीने मार्गक्रमण करतो. सिंह राशीत असलेला चंद्र कन्या राशीत प्रवेश करत आहे.

चंद्राच्या कन्या राशीतील प्रवेशामुळे विविध प्रकारचे योग जुळून येत आहे. कन्या राशीत सूर्य, बुध, केतु ग्रह विराजमान आहे. चंद्र कन्या राशीत आल्यानंतर ग्रहण योग जुळून आला आहे. त्यामुळे सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे सूर्य आणि चंद्र एकाच कन्या राशीत असणार आहेत. चंद्राच्या कन्या राशीतील प्रवेशामुळे केतुशी युती योग, तर राहुशी समसप्तक योग जुळून येणार आहे.

तर वृषभ राशीत असलेल्या गुरुशी नवपंचम योग जुळून येणार आहे. सूर्य आणि बुधामुळे कन्या राशीत बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. तर, शनी स्वराशीत असल्यामुळे शश नामक राजयोग जुळून आला आहे. या शुभ योगात नवरात्र उत्सव सुरू होत असून, याचा काही राशींना अपार लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: दृढनिश्चय, आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. एक एक करून अपूर्ण कामे पूर्ण कराल. काही महत्त्वाचे निर्णयही घ्याल. विचारांमध्येही प्रगती दिसेल. काम करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. करिअरमध्ये आणि पगारात चांगली वाढ दिसेल. व्यवसायात काही सकारात्मक बदल घडू शकतील. विक्रीत वाढ होईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

वृषभ: नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने आनंदी व्हाल. उत्पन्नात अचानक वाढ होईल. करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे. मनोकामना पूर्ण होतील. पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल.

कर्क: सुख, समृद्धी, यश मिळू शकेल. करिअर, व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते त्यांना अपेक्षित संधी मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर योजना फलदायी ठरण्याची शक्यता आहे. मित्र किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सत्ता आणि सरकारशी संबंधित योजनांचा लाभ घेऊ शकाल. मार्केटिंग आणि कमिशनशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी काळ शुभ ठरू शकेल.

सिंह: नशिबाची उत्तम साथ लाभेल. नोकरीत बदल शक्य आहे. करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तेथे निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच दैनंदिन उत्पन्न वाढेल.

तूळ: दररोजचे उत्पन्न वाढेल. तसेच काही चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाईफच्या दृष्टीने अविस्मरणीय राहणार आहे. सुख-समृद्धीमध्येही वाढ होऊ शकते. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

धनु: आगामी काळ विशेष फलदायी ठरू शकेल. धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी होऊ शकाल. गुंतवणुकीसाठी काळ चांगला असेल. सर्वत्र सन्मान मिळेल. काही कामे खूप दिवसांपासून अपूर्ण राहिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांशी ओळख वाढेल. काम करणाऱ्यांना सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. त्यांचा सल्ला उपयोगी पडेल.

मीन: आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत हसत आणि विनोदात काळ घालवतील. शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील. यशही मिळेल. अचानक मोठी रक्कम मिळून धनलाभ होऊ शकतो. व्यावसायिक योजनांसह पुढे जाण्यास सक्षम असाल. फायदा होईल. व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काळ चांगला असेल. स्वतःसाठी ऑनलाइन शॉपिंग करण्याची संधी मिळेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.