लग्न जुळत नाही, टेन्शन आलंय?; रुममध्ये 'हा' बदल करा, अडचणी दूर होतील By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 06:11 PM 2021-12-06T18:11:28+5:30 2021-12-06T18:14:29+5:30
विवाहेच्छुक मुला-मुलींच्या लग्नात विनाकारण उशीर होत आहे किंवा वारंवार नात्यात वितुष्ट येत आहे, असे वाटत असेल तर वास्तुशास्त्रातील काही उपाय करून बघा. त्याच्या प्रभावाने मंगल कार्यातील विघ्ने दूर होतील आणि घरातील वातावरण आनंदी राहील. लग्नाला उशीर होणे, लग्न मोडणे किंवा पती-पत्नीमध्ये वारंवार होणारी भांडणे. या अशा समस्या आहेत, ज्याच्या मागे इतर सर्व कारणांसोबत त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती आणि वास्तू दोषदेखील कारणीभूत असू शकतात. या समस्यांवर उपाय केल्यास चांगले परिणाम मिळतात. आज आपण वास्तुशास्त्रातील ते दोष जे वैवाहिक जीवनात अडथळा बनत आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.
घरातील मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाला उशीर होत असेल तर त्यांच्या खोलीची दिशा तपासून बघा. विवाहयोग्य मुला-मुलीची खोली नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला असावी. जर हे शक्य नसेल तर उत्तर दिशेला डोकं करून झोपणे देखील चांगले असते.
त्यांची शयन व्यवस्था भिंतीला चिकटून नसावी. झोपेतून उठताना दोन्ही बाजूने उठता येईल अशी असावी.
त्याच्या खोलीत राधा कृष्णाचे चित्र लावावे किंवा मोरपीस तसेच बासरी धारण केलेली श्रीकृष्णाची छबी असावी.
आपल्याकडे रुख्मिणी स्वयंवर या स्तोत्राला पूर्वापार खूप मान्यता आहे. उपवर मुला मुलींनी त्याचे नित्य पठण केल्यास त्यांना लवकर योग्य जीवनसाथी मिळतो असा आजवरचा अनेकांचा अनुभव आहे.