शनी देवाच्या साथीने 'या' सहा राशींची असेल ऑक्टोबर महिन्यात चांगलीच चलती! By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 04:40 PM 2021-09-30T16:40:39+5:30 2021-09-30T16:49:38+5:30
ऑक्टोबर महिना काही राशींसाठी आनंद घेऊन येत आहे. या महिन्यात शनि देवाची कृपादृष्टी विशेषतः पाच राशींवर राहणार आहे. शनी देवाचे भ्रमण आणि स्वतःच्या राशीत अर्थात मकर राशीत होणारा मुक्काम आनंददायी ठरणार आहे. केवळ मकर राशीसाठीच नाही तर आणखी पाच राशींसाठी! त्या भाग्यवान राशी कोणत्या आणि त्यांच्या भाग्यात आगामी काळात काय मांडून ठेवले आहे ते पाहू... मेष मेष राशीसाठी ऑक्टोबर महिना चांगला राहणार आहे. शनी देवाच्या स्थित्यंतरामुळे मेष राशीच्या लोकांच्या करिअरमधील चढ -उतार दूर होतील. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. यासह, जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि या महिन्यात एखाद्या शुभ मुहूर्तावर सुरू करा. कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमचा आदर वाढेल.
मिथुन मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसू लागतील. तुम्ही जे काही काम मनापासून कराल, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगला परिणाम देणाराही आहे. याशिवाय आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.
तूळ कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. आनंददायी क्षण वाट्याला येतील. शनीच्या वक्रदृष्टीचा विपरीत परिणाम कमी होईल. मित्रपरिवाराशी संबंध चांगले होतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे संकेत आहेत. नवीन संबंध जुळतील. नोकरी व्यवसायात यश मिळेल.
धनु या महिन्यात काही चांगली बातमी मिळेल. कुटुंबात तुमचा सन्मान होईल आणि आदर वाढेल. तुमच्या भावंडांना यश मिळू शकते, ज्याचा तुम्हाला आनंद होईल आणि तुमचे कौटुंबिक ओझे कमी होईल. व्यावसायिकांसाठी ही एक शुभ संधी आहे, ते त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात.
मकर पुढचे काही दिवस शनी देव आपल्या स्वगृही अर्थात मकर राशीत स्थिरावणार आहेत. त्यामुळे मकर राशीसाठी ही स्थिती खूप चांगली सिद्ध होईल. या राशीचे लोक संपत्ती चांगल्या प्रकारे जमा करू शकतील. आरोग्यही सुधारेल. आपले ध्येय गाठण्यासाठी शनी देवाची साथ लाभेल.
कुंभ कुंभ राशीचे लोक अध्यात्माकडे वाटचाल करतील. वैवाहिक जीवनात अनुकूल बदल होतील. तुमच्या कामामुळे तुमचे मूल्य वाढेल. व्यवसायात यश मिळेल पण व्यवहाराच्या बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे.