३ राजयोगांचा तिपटीने लाभ: ५ राशींची मिळकत वाढेल; वरदान काळ, परदेशी नोकरी, व्यवसायात फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 12:20 PM2023-12-02T12:20:53+5:302023-12-02T12:29:40+5:30

शुक्र, मंगळ आणि शनीशी संबंधित तीन राजयोग या राशींना शुभ-फलदायी ठरू शकतील, असे सांगितले जात आहे.

डिसेंबर सुरु झाला असून, या महिन्याच्या सुरुवातीलाच तीन सर्वोत्तम राजयोग जुळून येत आहेत. नवग्रहांपैकी तीन महत्त्वाचे ग्रह अशा स्थानी आहे, ज्यामुळे हे तीन राजयोग जुळून आले आहेत. याचा शुभ प्रभाव ५ राशीच्या व्यक्तींवर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक शुक्र मानला जातो. शुक्र ग्रह मूलत्रिकोणी रास तूळ राशीत आहे. यामुळे मालव्य नावाचा राजयोग जुळून आला आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे.

नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह वृश्चिक राशीत आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी मंगळ वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रह स्वराशीत असल्यामुळे रुचक नावाचा राजयोग जुळून येत आहे. हा राजयोगही शुभ मानला गेला आहे.

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह कुंभ राशीत आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. पुढील वर्षभर शनी याच राशीत असणार आहे. शनीचा शश नामक शुभ राजयोग जुळून आला आहे. शनी स्वराशीत असल्याने मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे.

विशेष म्हणजे नवग्रहातील हे तीन प्रभावशाली ग्रह स्वराशीत आहेत. असा योग प्रभावी मानला गेला आहे. शुक्र, मंगळ आणि शनी यांच्या स्थानांमुळे जुळून आलेल्या या तीन राजयोगांचा ५ राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ लाभ होऊ शकेल. नोकरी, व्यवसाय, व्यापार, करिअर यांमध्ये यश, प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: खूप उत्साह आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या आणि मित्रांच्या मदतीने अगदी अवघड कामेही सहज पूर्ण कराल. वडिलांच्या मदतीने कौटुंबिक समस्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकेल. प्रियजनांच्या भावना समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. नोकरीत अपेक्षित यश मिळाल्यास खूप आनंदी व्हाल. विवाहाची बोलणी अंतिम स्वरुपात येऊ शकतात. नवीन स्थळे येऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मिथुन: करिअरच्या दृष्टीने कालावधी अनुकूल असणार आहे. करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. बँक बॅलन्समध्येही वाढ झालेली दिसेल. व्यवसाय वाढविण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काळ अतिशय शुभ आहे. परदेशात नोकरी करणाऱ्यांना अतिशय शुभ परिणाम मिळू शकतील. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्येही काही चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी जाणार आहे.

सिंह: नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित जे काही प्रयत्न कराल ते यशस्वी होतील. मन प्रसन्न राहील. एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल. आयटी क्षेत्राशी संबंधित आणि परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा कालावधी सौभाग्याचा आहे. लव्ह लाइफच्या दृष्टीने आगामी काळ खूप अनुकूल असणार आहे. काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खूप दूरचा प्रवास करावा लागू शकेल.

धनु: इच्छेनुसार यश मिळेल. विरोधक तडजोड करण्याचा प्रयत्न करू शकतात. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. काही मोठा सन्मान मिळू शकतो. नोकरदारांना इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. विवाहित लोकांचे जीवन आनंदी असेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील.

मीन: अपेक्षित यश मिळू शकेल. प्रवास शुभ परिणाम देतील. सत्ता आणि राज्यकारभाराशी निगडीत लोकांसाठी काळ अतिशय शुभ असणार आहे. काही पद किंवा जबाबदारी दिली जाऊ शकते. अशक्य वाटणारी कामे सहज पूर्ण होतील. छोट्या व्यवहारात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. लव्ह लाइफसाठी पूर्णपणे अनुकूल असेल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची चांगली संधी मिळेल.

डिसेंबर महिन्यात नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. नवग्रहांचा सेनापती मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर, नवग्रहांचा राजकुमार बुध धनु राशीत असून, वक्री चलनाने वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.