५ राशींना डिसेंबर ठरेल लकी; मनाजोगे यश, मेहनतीचे योग्य फळ, इच्छापूर्तीचा समाधानी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 08:08 AM2023-11-29T08:08:08+5:302023-11-29T08:08:08+5:30

सन २०२३ चा अखेरचा डिसेंबर महिना कोणत्या राशींना उत्तम लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, सन २०२३ चा डिसेंबर महिना ग्रह गोचराच्या दृष्टिकोनातून विशेष ठरणारा आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य, मंगळ आणि शुक्र राशीपरिवर्तन करणार आहेत. तर बुध वक्री होणार आहे. याशिवाय गुरु मार्गी होणार आहे. तसेच डिसेंबर महिन्यात आदित्य मंगल, बुधादित्य योग जुळून येणार आहेत. हे दोन योग राजयोगाप्रमाणे शुभ-फले देतात, असे सांगितले जात आहे.

डिसेंबर महिन्यात नवग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह मेष राशीत मार्गी होणार आहे. सूर्य धनु राशीत आल्यानंतर मेषेत असलेल्या गुरुशी नवम पंचम योग जुळून येणार आहे. याशिवाय वर्षाच्या शेवटी लक्ष्मी नारायण योग जुळून येऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

एकूण ग्रहस्थिती पाहता डिसेंबरचा महिना ५ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ५ राशीच्या व्यक्तींना यश-प्रगतीची संधी मिळू शकेल, आर्थिक आघाडीवर फायदा होऊ शकेल, नोकरी-व्यवसाय-करिअर यांमध्ये उत्तम लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना खूप शुभ असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित परिणाम मिळतील. आदर वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बुद्धिमत्ता, विवेक आणि वाणीच्या मदतीने सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी मिळणार आहेत. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याच्या विचारात असलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतील. जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

सिंह राशीच्या व्यक्तींना डिसेंबर हा शुभ, सौभाग्य घेऊन येणारा ठरू शकेल. मेहनतीचा पुरेपूर फायदा मिळेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. समाजात मान-सन्मान मिळेल. व्यवसायिकांना हा महिना अतिशय शुभ असणार आहे. व्यवसायाचा विस्तार होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना कालावधी शुभ असणार आहे. लव्ह लाइफच्या महिना खूप अनुकूल असेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना यश आणि सर्व स्वप्नांच्या पूर्ततेचा ठरू शकेल. नशीब साथ देईल. आनंदाचे क्षण घालवण्याच्या अनेक संधी मिळतील. घरात आणि बाहेर मान-सन्मान वाढेल. कामाची आणि घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा होईल. रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल.बोलणे चांगले होईल याची काळजी घ्यावी लागेल. बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा.

तूळ राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना भाग्याचा ठरू शकेल. पदाचा आणि प्रतिष्ठेचा फायदा होईल. नोकरदारांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. आर्थिकदृष्ट्या काळ खूप चांगला असेल. बुद्धिमत्तेने आणि सामर्थ्याने विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. अनेक अशक्य कामे शक्य करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी काळ अतिशय शुभ असणार आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. भविष्यात फायदे मिळतील. कौटुंबिक जीवन खूप आनंदी जाणार आहे.

मीन राशीच्या व्यक्तींना डिसेंबरच्या सुरुवातीला अपेक्षित यश मिळेल. विशेष कार्य साध्य करण्यासाठी किंवा स्वप्ने साकार करण्यासाठी सर्वांचे पूर्ण सहकार्य मिळेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना हा महिना अतिशय शुभ ठरणार आहे. अपेक्षित नफा मिळेल. राजकारणाशी निगडित लोकांसाठी हा महिना खूप शुभ ठरणार आहे. जे लोक बर्‍याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना या महिन्यात चांगली संधी मिळणार आहे. मुलांशी संबंधित समस्या या महिन्यात संपतील.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.