dhanteras 2022 buy these things on dhanteras every wish will be fulfilled
Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणा 'या' छोट्या-छोट्या वस्तू, पूर्ण होईल मनोकामना! By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 10:33 PM2022-10-20T22:33:07+5:302022-10-20T22:48:53+5:30Join usJoin usNext Dhanteras 2022: धनत्रयोदशीचं एक विशेष महत्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी समुद्र मंथन झालं होतं आणि भगवान धन्वंतरीनं हाती अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. भगवान धन्वंतरीला प्रभू श्री हरीचं रुप मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी यमच्या दिशेनं दिवा पेटवण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी नेमकं काय-काय करायचं असतं ते जाणून घेऊ. भांडी धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. पण अनेकांना हेच ठावूक नसतं की नेमकी कोणती भांडी खरेदी करायची? नेमकी कोणत्या धातूची भांडी खरेदी करायची? धनत्रयोदशी दिवशी पितळेची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसंच खरेदी केलेलं पितळेचं भांडं पूर्व दिशेला ठेवावं. गुंतवणूक धनत्रयोदशी दिवशी गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. यादिवशी गुंतवणुकीसंदर्भातील जी कामं केली जातात ती यशस्वीपणे पूर्ण होतात. तसंच त्यातून फायदा देखील होतो. त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. धणे धनत्रयोदशी दिवशी धणे खरेदी करण्याची देखील परंपरा आहे. धणे समृद्धीचं प्रतिक मानले जातात. लक्ष्मी मातेचं पूजन करताना धणे अर्पण केले जातात आणि तिजोरीतही ठेवले जातात. तसंच धण्याचं रोप लावणं देखील शुभ मानलं जातं. चांदी धनत्रयोदशी दिवशी चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. चांदीला चंद्राचं प्रतिक मानलं जातं. चंद्र मनाची शांती आणि शितलतेचं द्योतक आहे. त्यामुळे या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी कोणतीही चांदीची वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.दीपदान धनत्रयोदशी दिवशी यम देवतेला दीप दान करण्याला खास महत्व आहे. धनत्रयोदशी दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ १३ पणत्या पेटवाव्यात. तसंच याच दिवशी मुख्य दीप रात्री झोपतानाच्या वेळेत पेटवणं महत्वाचं आहे. तसंत दीवा दक्षिण दिशेला असणं गरजेचं आहे. दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. गोमती चक्र सदृढ आणि संपन्न आयुष्यासाठी धनत्रयोदशीला ११ गोमती चक्र खरेदी केले पाहिजेत. धनत्रयोदशी दिवशी गोमती चक्र पिवळ्या वस्त्रात बांधून आपल्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवावेत.श्रृंगार साहित्य धनत्रयोदशी दिवशी विवाहित महिलांना साज-श्रृंगाराचं साहित्य भेट म्हणून देणं शुभ मानलं जातं. याशिवाय लाल रंगाची साडी आणि कुंकू देणंही चांगलं मानलं जातं. कशी करावी धन्वंतरीची पूजा घराच्या उत्तर दिशेला भगवान धन्वंतरीचा अमृत कलश हाती असलेला फोटो घ्यावा. त्यासमोर पाण्याचा कलश ठेवावा. तसंच समोर दिवा पेटवावा. यासह भगवान धन्वंतरी मंत्रांचा जप करावा. मंत्र पुढीलप्रमाणे- ओम नमो भगवते वासुदेव: धनवंतराये:, अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय, त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरुप, श्री धन्वंतरी स्वरुप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नम: टॅग्स :दिवाळी 2022Diwali