Diwali 2022: दीपोत्सव: दिवाळीत चुकूनही करु नका ‘ही’ १० कामे; लक्ष्मी देवी होईल नाराज, अवकृपा संभव! By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 07:36 AM 2022-10-19T07:36:18+5:30 2022-10-19T07:42:38+5:30
दिवाळीतील लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण अतिशय महत्त्वाचे मानले जाते. काही गोष्टी केल्याने नुकसान होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपोत्सव. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन हे दिवाळीचे मुख्य दिवस. हे दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानले जातात; कारण धनप्राप्तीसाठी लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवशी अनेक नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. यामुळे संपत्तीत अनंत वृद्धी होते, असे मानले जाते. (Diwali 2022)
तसेच या दिवशी अनेक ठिकाणी लक्ष्मी देवीसह कुबेर, धन्वंतरी यांचे पूजन केले जाते. यंदा सन २०२२ मध्ये ऐन दिवाळीत खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत अनेक शुभ योगही जुळून येत आहेत. परंतु, तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा व्हावी आणि ती कायम राहावी, असे वाटत असल्यास काही गोष्टी बिलकूल करू नयेत, असे सांगितले जाते.
दिवाळीत लक्ष्मीचे देवीचे पूजन, नामस्मरण महत्त्वाचे मानले गेले आहे. मात्र, अशा काही १० गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, ज्या केल्यास लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. अशी लोकं लक्ष्मी देवीच्या कृपेपासून वंचित राहू शकतात, असे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया नेमके काय करू नये ते...
ज्योतिषशास्त्रात झाडूला लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते. सायंकाळी तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा दिवेलागणीला कचरा काढू नये, असे म्हटले जाते. असे केल्याने लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
शास्त्रात अन्न आणि अग्नी हे दोन्ही पूजनीय मानले गेले आहेत. स्वयंपाकघरात या दोन्ही गोष्टींचा वास असतो. त्यामुळे अन्न शिजवताना किंवा स्वयंपाक करताना तेथे चप्पल, शूज परिधान करु नये. असे केल्याने लक्ष्मी देवीची अवकृपा होऊ शकते, असे म्हटले जाते.
शास्त्रानुसार, रात्री जेवण झाल्यानंतर शक्यतो जेवणाची खरकटी भांडी धुवून स्वयंपाकघर स्वच्छ करावे. रात्रीच्या जेवणानंतर उष्टी-खरकटी भांडी स्वच्छ करून न ठेवल्यास लक्ष्मी देवीची नाराजी ओढावू शकते, असे सांगितले जाते.
लवकर निजे, लवकर उठे, त्याला आरोग्य, ज्ञान, धनसंपदा लाभे, असे नेहमी म्हटले जाते. नेहमी सूर्योदयापूर्वी उठावे. खूप उशिरापर्यंत झोपून राहिल्यास यश, प्रगतीत अडथळे येऊ शकात. लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते, असे म्हटले जाते.
आंघोळ केल्यावर नेहमी सूर्यदेवाला जल अर्पण करा, कारण पृथ्वीवरील उर्जेचा तो एकमेव स्त्रोत आहे. असे न केल्यास घरात लक्ष्मीचा वास अत्यल्प असू शकतो, असे सांगितले जाते.
शास्त्रात पूजेदरम्यान शंखाचा वापर केला जातो. शंखाच्या ध्वनीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. कुळधर्म, कुळाचार असूनही शंखनाद न केल्यास लक्ष्मी देवीची अवकृपा होऊ शकते, असे म्हटले जाते.
आपल्या शास्त्रात फुंकर मारून दिवा घालवण्याची पद्धत प्रचलित नाही. कारण आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये दिव्याला देवाचा दर्जा दिला गेला आहे. ज्या घरात दिवा फुंकर मारून विझवला जातो. तेथे लक्ष्मीचा वास असत नाही, असे सांगितले जाते.
वदनी कवळ घेता, हा श्लोक म्हटला जातो. तो एक संस्काराचाही भाग आहे. जेवताना अन्नपूर्णेबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे न केल्यास लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते, असे म्हटले जाते. त्यामुळे नियमितपणे अन्नदेवतेचे आभार मानावेत, असे म्हटले जाते.
अनेकांना नखे कुरतडण्याची सवय असते. ही सवय वाईट मानली जाते. वारंवार असे केल्यास लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते, असे सांगितले जाते. अशा सवयी शक्य तितक्या लवकर सोडाव्यात, असाही सल्ला दिला जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.