Diwali 2022: दिवाळीत लक्ष्मी पूजेबरोबर करा 'हे' काम, नशीब सोन्यासारखे चमकेल! By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 02:32 PM 2022-10-13T14:32:42+5:30 2022-10-13T14:39:08+5:30
Diwali 2022: दिवाळीचा सण सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळीच्या दिवसात आपल्या आनंदासाठी आपण पैसे खर्च करतो, त्याचबरोबर पैसे, धन, धान्य सुबत्ता यावी म्हणून लक्ष्मीपूजनही करतो. या पूजेत काही उपचारांची जोड दिली असता लक्ष्मी माता प्रसन्न होईल याची खात्री बाळगा. स्फटिकाची श्रीयंत्रे बाजारात उपलब्ध आहेत, एक खरेदी करा आणि यावेळी दीपावलीच्या दिवशी पंचामृत आणि गंगाजलाने स्नान करून उदबत्तीचा नैवेद्य अर्पण करा आणि लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करा.
कमळाच्या बियांपासून बनवलेली जप माळ विकत आणा आणि त्याचाही लक्ष्मी पूजेत समावेश करा. देवीच्या कृपादृष्टीने पावन झालेली माळ हाती घेऊन नियमित वेळ ठरवून देवीच्या मंत्राचा जप करा.
या दिवाळीपासून रोज सकाळ-संध्याकाळ देवाची पूजा करा. तिन्ही सांजेला देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावा. उंबरठ्याची पूजा करा. या गोष्टी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात.
वसुबारसेच्या दिवशी आपण गोमातेची पूजा करतोच, पण शास्त्रानुसार सदासर्वदा गोमातेची पूजा करणारे, तिचे रक्षण करणारे जे सेवक असतात त्यांच्यावर लक्ष्मी मातेचा कायम स्वरूपी वरदहस्त असतो.
घरातील अन्नधान्याचा अनादर करू नका. तुमची भूक आणि क्षमता असेल तितके बनवा आणि खा. ज्या घरांमध्ये अन्नधान्याचा आदर केला जात नाही, अन्नाची फेकाफेक केली जाते. अन्न वाया जाते, तिथे लक्ष्मी माता कधीच टिकत नाही.