घरातील आरसा आणि दाराबाहेर लावलेली घोड्याची नाल किती लाभदायक असते, माहितीये? By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:19 PM 2021-09-27T15:19:43+5:30 2021-09-27T15:39:16+5:30
मनुष्याला यशस्वी आयुष्य जगता यावे यासाठी अनेक उपाय वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्, लाल किताब इत्यादी मध्ये सांगितले गेले आहेत, जे व्यक्तीच्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करतात. यामध्ये आरसा आणि घोड्याची नाल मोठी भूमिका बजावते. वास्तुशास्त्रात, नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींद्वारे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याच्या पद्धती दिल्याआहेत. यामध्ये आरसा तसेच तुळस, फुलझाडे, घंटा, घोड्याची नाल, मीठ अशा अनेक गोष्टींचा समावेश केला जातो. सविस्तर जाणून घेऊया या उपायांविषयी!
चेहरा पाहण्यासाठी आपण सहसा आरसा वापरतो, पण वास्तूमध्ये ती अतिशय उपयुक्त गोष्ट मानली गेली आहे. दर्पणात अनेक वास्तू दोष काढून टाकण्याची शक्ती आहे. पण एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आरसा ठेवू नये. असे करणे अत्यंत अशुभ ठरते.
जर घराचा ईशान्य कोपरा रुंद किंवा लहान असेल तर तिथे मोठा आरसा लावा. यामुळे, ती जागा मोठी दिसू लागते आणि ती वास्तू दोष दूर करते. ड्रेसिंग रूमच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर आरसा ठेवा. आरशाची अशी दिशा लाभदायक ठरते.
बेडरूममध्ये आरसा लावू नका, जर असेल तर रोज रात्री पडद्याने झाकून ठेवा.
घोड्याची नाल नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो. घोडा हे शक्तीचे, ऊर्जेचे, उत्साह व चैतन्याचे प्रतीक आहे. म्हणून त्याची नाल दाराला अडकवली जाते. त्यामुळे नैराश्य, काळजी, चिंता घरापासून दूर राहते आणि घरातले वातावरण आनंददायी होते.
घोड्याची नाल अनेक शतकांपासून वापरला जाणारा वास्तुशास्त्रातला प्रभावी उपाय आहे. वास्तु व्यतिरिक्त, ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबामध्ये घोड्याच्या नालाचा वापर देखील खूप महत्वाचा म्हणून वर्णन केला गेला आहे. विशेषतः काळ्या घोड्याची नाल घरातील अनेक वास्तू दोष दूर करण्यास सक्षम ठरते. म्हणून ती दाराच्या चौकटीवर अडकवली जाते.