तुम्हाला तुमचा जन्मवार माहित आहे का? मग 'ही' माहिती वाचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 12:42 PM2022-01-25T12:42:20+5:302022-01-25T12:47:17+5:30

आपली जन्मतिथी, जन्मनक्षत्र, जन्मदिनांक याचप्रमाणे जन्मवारावरूनही ज्योतिषशास्त्र ढोबळ भाकित वर्तवते. कुंडलीमध्ये जन्मवार लिहिलेला असता़े तुम्हाला तुमचा जन्मवार आठवत नसेल तर कुंडली तपासून किंवा मोबाईल कॅलेंडरवर तुमची पूर्ण जन्मतारीख टाकून तो जाणून घ्या आणि पुढील माहितीशी स्वत:चे व्यक्तिमत्त्व ताडून पाहा!

रविवारी जन्म घेणारी बालके हुशार असतात. त्यांच्याकडे तीक्ष्ण बुद्धी असते. ते व्यवहारात चतुर, स्वभावाने प्रेमळ आणि दानधर्मात पुढे असतात. ते आपल्या ध्येयाप्रती सजग असतात आणि आपले आयुष्य सत्कारणी लावतात.

सोमवारी जन्म घेणारी बालके स्वभावाने शांत असतात. सुख-दु:खात त्यांचे चित्त विचलित होत नाही. त्यांची स्थितप्रज्ञ वृत्ती कायम असते. ते बुद्धीवान तसेच धैर्यवान असतात. सरकारी नोकरीची शक्यता जास्त असते. अनेक संकटे येऊनही ते आपले आयुष्य शांतपणे व्यतित करतात.

मंगळवारी जन्माला आलेली बालके शूरवीर असतात. त्यांच्याकडे शौर्य आणि धैर्य ठासून भरलेले असते. ते उष्ण प्रकृतीचे असतात. त्यांना बौद्धिक कार्यात विशेष रूची नसते. परंतु वीरता दाखवण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी ते कायम अग्रेसर राहतात.

बुधवारी जन्माला आलेली बालके शांतीप्रिय असतात. त्यांच्या स्वभावात आणि बोलण्यात गोडवा असतो. ते लेखक, कवि किंवा चांगले वक्ते बनतात. आपल्या वक्तृत्त्वाने ते कमी कष्टात ध्येय साध्य करतात. आनंदी जीवन जगतात.

गुरुवारी जन्माला आलेली बालके शांत वृत्तीची असतात. ते अतिशय चतुर आणि हुशार असतात. विद्वान व्यक्ती अशी त्यांची ख्याती होते. हे लोक आयुष्यात उच्च पद भुषवतात. न्यायाधीश, मंत्री, लेखक इ.

शुक्रवारी जन्माला आलेली बालके तामसी वृत्तीची असतात. त्यांचा कल थोडा नास्तिकतेकडे झुकलेला असतो. डोक्यात राग घालून घेणे, दुसऱ्याला कमी लेखणे, तोडून बोलणे या स्वभावामुळे त्यांचे कोणाशीही बनत नाही. ते एकाकी आणि एकांगी आयुष्य जगतात.

शनिवारी जन्माला आलेली बालके तीक्ष्ण बुद्धीची असतात. ध्येयाप्रती सजग असतात. शारीरिक प्रकृती ठीक नसली तरी मानसिक स्थितीची जोरावर ते ध्येयप्राप्ती करतात. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून त्यांनी केलेल्या कामाचे सर्वांकडून कौतुक होते. ध्येयप्राप्तीमुळे ते समाधानी आयुष्य जगतात.