नशिबाला दोष देत बसू नका, राशीनुसार दिलेले उपाय करा आणि यशस्वी व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 13:10 IST2021-08-17T12:55:06+5:302021-08-17T13:10:07+5:30
ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय, तरी यश येत नाहीये? याचा अर्थ तुमच्या प्रयत्नांना गरज आहे उपासनेची. उपासना केल्याने मनोबल वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि आपण करत असलेल्या प्रयत्नांना इच्छाशक्तीची जोड मिळते. यासाठी फार कष्ट घेण्याची किंवा खूप वेळ खर्च करण्याची गरज नाही, तर गरज आहे राशीनुसार दिलेले उपाय मनोभावे करण्याची! ते उपाय कोणते ते जाणून घेऊ.

मेष
मेष राशीच्या लोकांनी कोणत्याही मंगळवारपासून पुढील २७ दिवस सातत्याने गणपतीला दुर्वा वहाव्यात.
वृषभ
नोकरीत अडचणी उद्भवत असतील तर तुमच्या सोयीनुसार कोणत्याही सोमवारपासून महादेवाला पुढील २७ दिवस पांढरे फुल अर्पण करावे आणि सुगंधी अत्तर लावावे.
मिथुन
या राशीच्या लोकांनी सलग एक महिना हनुमान चालीसा किंवा हनुमान स्तोत्र म्हणावे.
कर्क
या राशीच्या लोकांनी सलग चाळीस दिवस पिंपळाच्या वृक्षाखाली तेलाचा दिवा लावावा.
सिंह
श्रावण मासात या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करावा.
कन्या
सूर्यपूजा तुम्हाला लाभदायी ठरू शकते. तसेच सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे तुम्ही अनुभवू शकता. सलग महिनाभर सूर्यपूजा करा.
तूळ
या राशीच्या लोकांनी गरजूंना फळं किंवा जीवनावश्यक गोष्टींचे दान करावे, ते शक्य नसेल तर महिनाभर एखाद्या भिक्षेकऱ्याला केळं द्यावे.
वृश्चिक
या राशीच्या लोकांनी सलग नऊ दिवस देवीच्या मंदिरात दूध, दही, तांदूळ, खोबरे यांसारख्या पांढऱ्या वास्तूचे दान करावे.
धनु
या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा असल्याने त्यांनी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करावे.
मकर
या राशीच्या लोकांनी सलग २७ दिवस गणपती बाप्पाला लाडू, गूळ खोबरे, खडीसाखर असा कोणताही यथाशक्ती नैवेद्य दाखवावा, तो प्रसाद सर्वांना वाटावा आणि स्वतः ग्रहण करावा, फरक जाणवेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनी महादेवाचा अभिषेक करावा. बेलाचे पान वाहावे आणि शिवस्तोत्र पठण करावे.
मीन
मीन राशीच्या लोकांनी सलग महिनाभर पिंपळाच्या वृक्षाला ११ प्रदक्षिणा घालाव्यात.