२६ ऑगस्ट नंतर 'या' चार राशींच्या भाग्याचे उघडणार द्वार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 16:21 IST2021-08-24T16:13:34+5:302021-08-24T16:21:46+5:30
कुंडलीत बुधाचे स्थान अनुकूल असेल तर आयुष्यातील मुख्य घडामोडींवर त्याचा अनुकूल प्रभाव पडतो. बुध हा ग्रह तर्क, मैत्री, ज्ञान, संभाषण अशा गोष्टींना पाठबळ देतो. २६ ऑगस्ट रोजी बुध ग्रहाचे सिंह राशीतून कन्या राशीत स्थित्यंतर होणार असल्यामुळे आगामी काळ चार राशींसाठी भाग्योदयाचा काळ ठरणार आहे.

सिंह
आगामी काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणार असाल तर हा काळ तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तसेच आयुष्याचा जोडीदार निवडण्याची संधी या काळात दवडू नका. कुटुंबाला वेळ द्या.
कन्या
बुध ग्रहाचा कन्या राशीतील प्रवेश त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. तुमचे भाग्य तुम्हाला प्रगतीपथावर नेणार आहे. या काळात तुमची आर्थिक भरभराट संभवते तसेच घरात आनंदाची वार्ता येऊ शकते.
तूळ
येत्या काळात तुमच्या कामाला मान्यता मिळेल. तुमच्या श्रमाचे चीज होईल. आवक वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. भावा-बहीणचे सान्निध्य मिळेल.
वृश्चिक
बुधाचे स्थित्यन्तर या जातकांना विशेष लाभदायक ठरणार आहे. नोकरी असो वा व्यवसाय हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला पदोन्नती मिळेल, तसेच आर्थिक लाभ व यश मिळण्याची चिन्हे आहेत.