शनी परिक्रमेमुळे 'या' चार राशींच्या वाट्याला येणार अपार धनसंपत्ती; होणार भाग्योदय! By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 12:51 PM 2022-03-19T12:51:06+5:30 2022-03-19T12:54:58+5:30
ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्ती विकासाच्या दृष्टीने शनिदेव हा मुख्य प्रभावी ग्रह आहे. ते अडीच वर्षांतून एकदा राशी बदलतात. सन २०२१ मध्ये शनीने एकदाही राशी बदलली नाही आणि आता २०२२ मध्ये दोनदा राशी बदलणार आहेत. २९ एप्रिल रोजी शनिदेव राशी बदलतील आणि मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करतील, परंतु ५ जूनपासून ते मागे जातील आणि पुन्हा मकर राशीत येऊन राहतील. यानंतर १७ जानेवारी २०२३ पर्यंत ते मकर राशीत राहील. पश्चात ते पुन्हा कुंभ राशीत येतील. न्यायाची देवता मानला जाणारा आणि ज्योतिष शास्त्रातील सर्वात महत्वाचा ग्रह मानला जाणारा शनी ग्रह दोनदा स्थित्यंतर करणार असल्याने चार राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होतील.
मेष - शनीचा राशी बदल मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. नोकरीत बढती मिळेल. मानसन्मान मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी संबंध चांगले राहतील.
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांना २९ एप्रिलनंतर नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या मेहनतीला आता फळ मिळेल. तुम्हाला नोकरीत अपेक्षित यश मिळू शकते. बॉसशी चांगले संबंध निर्माण होतील. कामाची प्रशंसा आणि पदोन्नती होईल. धनलाभ होईल.
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ भरपूर पैसा मिळवून देणारा ठरेल. आर्थिक स्थिती प्रभावी राहील. परदेश प्रवास होऊ शकतो. विशेषत: व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल.
मकर - मकर राशीसाठीही हा काळ अतिशय शुभ राहील. भरपूर धनलाभ होईल. करिअर-व्यवसायासाठी हा काळ चांगला राहील. नवीन नोकरी मिळू शकते. तसेच जुन्या नोकरीत बढती-वाढ मिळू शकते. हा काळ व्यावसायिकांसाठी भरपूर नफा घेऊन येईल. मोठे आर्थिक व्यवहार होऊ शकतात.