बाप्पाला आपण मंगलमूर्ती म्हणतो, म्हणजेच त्याला पाहताच आपल्यालाही प्रसन्न वाटते. यासाठीच आपण आपल्या घरात देवघराव्यक्तिरिक्त बाप्पाची तसबीर किंवा मूर्ती शोभेसाठीदेखील ठेवतो. एवढेच काय, तर वाढदिवस, वास्तुशांत, गृहप्रवेश, लग्न, साखरपुडा अशा मंगल समयी देखील बाप्पाची सुंदर मूर्ती भेट देतो. परंतु देवाची मूर्ती भेट देताना तिचे पावित्र्य सांभाळले जाणार आहे का हेही लक्षात घेतले पाहिजे. यादृष्टीने वास्तुशास्त्राने काही नियम आखून दिले आहेत, त्याचे आपण पालन केले पाहिजे.