Feng Shui: गोल्ड फिश पाळणे शक्य नाही? मग सोनेरी मत्स्य मूर्ति घेऊन या; दुप्पट लाभ होईल! By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:32 AM 2024-02-22T10:32:35+5:30 2024-02-22T10:35:04+5:30
Feng Shui: फेंग शुई हे चीनचे वास्तुशास्त्र आहे. यामध्ये इमारतीच्या बांधकामाविषयी आणि इमारतीत ठेवलेल्या पवित्र वस्तूंची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फेंग आणि शुईचा शाब्दिक अर्थ हवा आणि पाणी आहे. हे शास्त्र देखील आपल्यासारखेच पंच महाभूतांवर आधारित आहे. याच फेंगशुई टिप्स पैकी गोल्ड फिश घरात ठेवण्याचे फायदे जाणून घेऊ . सोनेरी मासे दोन प्रकारे ठेवता येतात. एक त्याची मूर्ती आणि दुसरी मत्स्यालयात जिवंत असलेली सोनेरी मासे. दोन्हीमधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढली जाते.
गोल्डन फिशची सुंदर मूर्ती ठेवल्याने सौभाग्य वाढते. हे मासे बाजारात जोड्यांमध्ये उपलब्ध असतात. घराचे सौभाग्य वाढवण्यासाठी गोल्डफिश खूप मदत करतात.
घरात सोनेरी माशाची मूर्ती ठेवल्याने समृद्धी येते आणि संपत्ती वाढते. आर्थिक अडचणी कमी होतात. ही मूर्ती दिसायलाही आकर्षक दिसते आणि ती पैसा, संपत्ती आकर्षून घेते व घरात भरभराट आणते.
गोल्डफिश घराच्या ड्रॉइंग रूमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवता येते. हे आनंद, शांती आणि समृद्धी आणते. पूर्व आणि उत्तर या दिशा सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आहेत. त्यामुळे या दिशेने ठेवलेली मत्स्यमूर्ती सकारात्मक परिणाम देणारी ठरते.
घरात या माशाच्या उपस्थितीमुळे प्रगतीचे सर्व दरवाजे उघडले जातात आणि कामात कोणताही अडथळा येत नाही. मत्स्य मूर्ती फेंगशुई शास्त्रात जशी महत्त्वाची तशी वास्तू शास्त्रात मत्स्यावतार रूपानेही महत्त्वाची. त्यामुळे अशा मूर्तीची खरेदी करून ती घरात ठेवावी व तिचा लाभ घ्यावा.