बारा राशींसाठी कसा असेल सप्टेंबर महिना, ते जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 02:43 PM 2021-08-31T14:43:20+5:30 2021-08-31T15:06:00+5:30
या वर्षातले शेवटचे चार महिने उरले आहेत. आधीचे वर्ष कसे गेले, याचे व्यक्तिपरत्वे अनुभव वेगवेगळे असतील. परंतु आगामी काळ कसा असू शकेल याचे ढोबळ शब्दचित्रण पंचांगात दिले आहे. त्यानुसार हा सबंध महिना पाहू. मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक अडचणींचा असेल. नोकरीत त्रास होईल. शेतीत सामान्य नफा होईल. व्यवसाय ठीक राहील. महिन्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती सुधारेल. आईचे आरोग्य सुधारेल. शारीरिक अडचणी उद्भवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा, त्यामुळे आरोग्य सुदृढ राहील. भावंडांचे शुभकार्य ठरेल. नवीन कामाची सुरुवात होईल. तारीख ७, २१ शुभ आहे, ११ अशुभ आहे. मन:शांतीसाठी 'ओम अंगारकाय नम:' चा जप करा
वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना राजकीय यश देणारा असेल. नोकरीत प्रगती होईल. कृषी क्षेत्रात मध्यम लाभ होईल. व्यवसायात यश मिळेल. नात्यामध्ये थोडी विसंगती असू शकते. आईचे सहकार्य मिळेल.जुन्या मित्रांच्या भेटीगाठी फायदेशीर ठरतील. परदेश प्रवासाची शक्यता आहे. तारखा ४,१३ शुभ आहेत, १९ अशुभ आहेत. देवीची उपासना फायदेशीर ठरेल.
मिथुन मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना भौतिक सुखसोयींचा असेल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सामाजिक संस्थेशी संबंध येईल. व्यवसाय चांगला होईल. नोकरीत सहकाऱ्यांसोबत थोडा त्रास होईल. कृषी क्षेत्रात मध्यम लाभ होईल. बहिणीची तब्येत सुधारेल. कुटुंबात परस्पर सामंजस्य राहील. तारखा १२,३० शुभ आहेत, १८ अशुभ आहेत. राधाकृष्णाची पूजा करणे फायदेशीर ठरेल.
कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना पूर्वीपेक्षा चांगला असेल. व्यवसायात हळूहळू नफा होईल. नोकरीत अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. कृषी क्षेत्रात मध्यम लाभ होईल. सासरच्या मंडळींकडून सहकार्य मिळेल, परंतु माहेरच्या बाजूने कुरबुरी होईल. महिन्याच्या शेवटी शारीरिक त्रास होईल. तारखा ८,२६ शुभ आहेत, १० अशुभ आहेत. राम स्तुती लाभदायक ठरेल.
सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना कौटुंबिक त्रास देणारा असेल. शेती चांगले उत्पन्न देईल. नोकरीत प्रगती होईल. व्यवसाय चांगला होईल. आरोग्याची चिंता राहील. आईची काळजी घ्या. वडिलांचा समाजात आदर वाढेल, कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये तणावाची स्थिती कमी होईल. दूरच्या नातेवाईकाकडून तुम्हाला लाभ मिळेल. धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे. तारखा १६,२५ शुभ आहेत, ११ अशुभ आहेत. गणेश उपासना फायदेशीर ठरेल.
कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना जीवन साथीदाराच्या प्रगतीचा असेल. कृषी क्षेत्रात अडचणी येतील. नोकरीत तुम्ही ठीक असाल. व्यवसायात मध्यम लाभ होईल. महिला सहकाऱ्यांकडून त्रास होऊ शकतो. काळजीपूर्वक काम करा. तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ मिळेल. राजकारणात यश मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. तारीख ३,२१ शुभ आहे, १७ अशुभ आहे. शुक्राचे दान आणि गणेशाची पूजा करणे फायदेशीर ठरेल.
तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना भाग्यकारक ठरू शकेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. व्यवसायात पहिल्या आठवड्यात त्रास होईल परंतु नंतर सगळे चांगले होईल. कृषी क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित समस्या येतील. जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल तारखा ९,२७ शुभ आहेत, ४ अशुभ आहेत. शनी जप फायदेशीर ठरेल.
वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना सामाजिक प्रतिष्ठेचा असेल. व्यवसाय ठीक होईल. कृषी क्षेत्रात मध्यम लाभ होईल. नोकरीत सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. सासरच्या मंडळींकडून मानसिक आधार मिळेल. पूर्वजांच्या जमिनीबाबत कुटुंबात मतभेद निर्माण होतील. आई वडिलांना तीर्थाटन करता येईल. दिनांक ११, २० शुभ आहेत, १५ अशुभ आहेत. गायत्री मंत्र लाभदायक ठरेल.
धनु धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना कोर्ट -कचेरीत विजय देणारा असेल. व्यवसायात प्रगती होईल. कृषी क्षेत्रात सामान्य लाभ होतील. नोकरीत कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुमच्या स्वतःच्या आरोग्यामध्ये समस्या असू शकते. तुम्हाला तुमच्या भावाकडून आर्थिक मदत मिळेल. जोडीदाराला रोजगार मिळेल. यशाचा मार्ग मोकळा होईल. तारखा ५,२३ शुभ आहेत, १४ अशुभ आहेत. शिव-शक्ती उपासना फायदेशीर ठरेल.
मकर मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र फळांचा असेल. कृषी क्षेत्रात अडचणी येतील. व्यवसायात प्रथम त्रास, नंतर काम सुरळीत होईल. नोकरीत सहकाऱ्यांसोबत वाद होईल. आईकडून मानसिक आणि आर्थिक सहाय्य मिळेल. तब्येत सुधारेल. जुन्या मित्राकडून तुम्हाला व्यावसायिक लाभ मिळतील. नात्यात वडिलांचा आदर वाढेल. दिनांक १३, २२ शुभ आहेत, ३ अशुभ आहेत. गुरु उपासना फायदेशीर ठरेल.
कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना सुखाचा असेल. कृषी क्षेत्रात सामान्य लाभ होतील. नोकरीत अधिकारी वर्ग आनंदी राहील. व्यवसाय ठीक होईल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक त्रास होईल. जोडीदाराला मानसिक तणाव राहील. वडिलांची पूर्ण साथ मिळेल. नातेवाईक पाठीशी उभे राहतील. तारीख ७,१६ शुभ, १२ अशुभ आहेत. शिव उपासना फायदेशीर ठरेल.
मीन मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना सामान्य राहील. कृषी क्षेत्रात मध्यम लाभ होईल. नोकरीत सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल, पण व्यवसायात अडचणी येतील. आईशी मतभेद होतील. मुलांचे विवाह योग असतील. भाऊ आणि कुटुंबाकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. घरात शुभ कार्याची शक्यता आहे. तारीख १,२८ शुभ आहे, ११ अशुभ आहे. हनुमानाची उपासना फायदेशीर ठरेल.