मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:40 PM2024-12-04T13:40:00+5:302024-12-04T13:55:54+5:30

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाते. कोणत्या राशींवर विशेष फलदायी, पुण्यकारक ठरू शकेल? जाणून घ्या...

मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. मार्गशीर्ष महिना अनेकविध गोष्टींमुळे महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्षातील गुरुवारला अनन्य साधारण महत्त्व असून, या दिवशी लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाते. तसेच गुरुवार हा दिवस गुरु ग्रह, दत्तगुरु, दत्तपरंपरेतील अवतारी पुरुषांना समर्पित मानला जातो. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते.

मार्गशीर्षातील पहिला गुरुवार ५ डिसेंबर रोजी आहे. या दिवशी दत्तगुरू, स्वामी समर्थ, साईबाबा यांचे विशेष पूजन केल्यास शुभपुण्याची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते.

शुक्र ग्रह मकर राशीत विराजमान झालेला आहे. मंगळ आणि शुक्राचा समसप्तक योग जुळून आला आहे. तर शुक्र आणि गुरुचा नवमपंचम योग जुळून आलेला आहे. मार्गशीर्षातील पहिला गुरुवार आणि आगामी कालावधी कोणत्या राशींना सर्वोत्तम वरदान काळाप्रमाणे ठरू शकतो, ते जाणून घेऊया...

मेष: नोकरीत अचानक मोठी संधी मिळू शकते. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. थोडा सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. काही चांगले अनुभव येतील. बेपर्वाईने वागू नका. अनुकूल फळे मिळतील. अनेक अडचणी दूर होतील.

वृषभ: काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. फार अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. इतरांच्या प्रश्नात गुंतून पडू नका. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. घरगुती स्वरूपाचे वाद विकोपाला जाणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे योग्य राहील. जीवनसाथीच्या कलाने घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

मिथुन: साधकबाधक अनुभव येतील. संयमाने वागण्याची गरज आहे. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. योजना लोकांना सांगू नका. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. भेटवस्तू प्राप्त होतील. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करावे.

कर्क: सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढा. मनात काही शंका असतील. ज्येष्ठांचा सल्ला घ्या. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा. वेळ वाया घालवणाऱ्या आणि खर्चात पाडणाऱ्या लोकांपासून कटाक्षाने दूर राहा. चांगल्या सवयींचा अंगीकार करणे आवश्यक आहे. कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. आर्थिक लाभ होण्याच्या दृष्टिने चांगला काळ आहे.

सिंह: घरात कुरबुरी होऊ शकतात. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात सतत व्यस्त राहाल. काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल. पुरस्कार जाहीर होतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मान वाढेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील.

कन्या: एखादे स्वप्न साकार होऊ शकते. थोड्या प्रयत्नातच जास्त यश मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. सुरुवातीला व्यवसायात थोडी धावपळ करावी लागेल. कामानिमित्त फिरावे लागेल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांशी गैरसमज होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. बढती, पगारवाढ मिळेल.

तूळ: काही अडचणी येतील. कालांतराने परिस्थिती आटोक्यात येईल. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत वर्चस्व राहील. कामात बदल होऊ शकतात. सहकारी वर्गाला सांभाळून घ्या. जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील.

वृश्चिक: जे ठरवाल ते सिद्धीस जाईल, अशी परिस्थिती राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. लाभ होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भेटवस्तू प्राप्त होतील. एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे कराल. मनात काळजीचे विचार राहतील. थोडा सकारात्मक विचार केला पाहिजे. घरात मंगल कार्य ठरेल. नोकरीत कामाचा ताण राहील.

धनु: लाभदायक परिस्थिती राहील. काही अडचणी असतील. संयमाने वागण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ फळे मिळतील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव येतील. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

मकर: वेळेचे नियोजन नीट केले पाहिजे. लोक मदत करण्यासाठी पुढाकार घेतील. त्यांचा हेतू लक्षात घ्या. काही लोक चुकीचा सल्ला देतील. पैशाचा ओघ सुरू राही राहील. मात्र, चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वेळ वाया घालवणाऱ्या मित्रांपासून दूर राहा. जीवनसाथीची साथ राहील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.

कुंभ: अकल्पित लाभ होऊ शकतात. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील; त्यावर संयमाने वागून मात कराल. घरी पाहुणे मंडळी येतील. वादाचे प्रसंग खुबीने टाळा. शुभ फळे मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. महत्त्वाची कामे या काळात हातावेगळी करा. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. जीवनसाथीचे मन न मोडू नका.

मीन: विविध क्षेत्रांत हातून उल्लेखनीय कामगिरी होईल. मुलांच्या यशाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. कामात लोक चुका काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांना पुरून उराल. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. योग्यतेची दखल घेतली जाईल. पगारवाढ, बढती, तत्सम लाभ अशी फळे मिळतील. वास्तू खरेदीचे मनसुबे सिद्धीस जातील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.