Foot Palmistry : तुमचे पायही सांगतात की तुम्ही किती भाग्यवान आहात ते.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 08:12 PM2022-03-30T20:12:45+5:302022-03-30T20:14:08+5:30

पाहा काय सांगतात तुमच्या तळपायावरील रेषा.

ज्याप्रमाणे माणसाच्या तळहातावर भाग्यरेषा असते, त्याचप्रमाणे माणसाच्या तळपायावर उभी रेषा असते. ही उभी रेषा जितकी लांब आणि सखोल, स्पष्ट असेल तितकी व्यक्ती अधिक चांगली आणि भाग्यवान असेल. हस्तरेषा शास्त्रानुसार ही रेषा टाचेच्या खालच्या भागापासून सुरू झाली तर आणखी शुभ फल देते. तुमची बोटे आणि रेषा तुमच्या भविष्याबद्दल काय सांगतात हे आपण पाहू.

जर तळपायावर उभ्या रेषेच्या खाली तीन रेषा असतील आणि तिन्ही रेषा एका ठिकाणी एकत्र येत असतील आणि तिथून एक रेषा सरळ बोटांच्या दिशेने जात असेल तर अशा व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंद आणि यश मिळते.

पायाच्या तळापासून मधल्या बोटापर्यंत जी रेषा जाते तिला मद रेषा म्हणतात. ज्या व्यक्तीच्या पायावर अशी रेष असते ती व्यक्ती खुप दानशूर असते. ही रेषा तळपायाच्या केवळ एक चतुर्थांश भागात असते आणि ती खूप शुभ मानली जाते.

डाव्या पायाच्या अंगठ्याखाली असलेल्या बोटाच्या रेषेखाली कोणतीही रेषा दिसत असेल तर तिला द्वास्था रेषा म्हणतात. ज्या व्यक्तीच्या पायावर ही रेषा असते. तो श्रीमंत, यशस्वी आणि सद्गुणी असतो. ही रेषा जितकी लांब असेल तितके शुभ परिणाम देते.

उभ्या रेषेप्रमाणे दुसरी कोणतीही रेषा असेल तर तिला शाकटायिनी रेषा म्हणतात. शाकटायिनी रेषा उभ्या रेषेप्रमाणे शुभ परिणाम देते. अशी रेषा असलेली व्यक्तीला धन, कीर्ती आणि सर्व प्रकारच्या सुख-समृद्धी प्राप्त होते.

जर एखाद्या व्यक्तीच्या पायाची बोटे सारखी असतील आणि अंगठा लांब असेल तर अशा व्यक्तीला कलेची जास्त आवड असते. अशा लोकांना प्रत्येक गोष्टीत खूप संशोधन करतात. त्याच वेळी, जर एखाद्या व्यक्तीच्या पायाचे बोट अन्य बोटांच्या समान असेल तर अशी व्यक्ती खूप मजबूत असते. अशा लोकांना इतरांवर आपला प्रभाव दाखवण्याची सवय असते. असे लोक चांगले नेते देखील असतात. अशा लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे कसे बोलायला लावायचे हे चांगलेच ठाऊक असते.