गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 10:21 AM2024-11-15T10:21:04+5:302024-11-15T10:29:36+5:30

लक्ष्मी देवीचा वरदहस्त लाभू शकतो. आगामी कालावधी सुवर्ण काळाप्रमाणे जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला गजकेसरी योग जुळून येत आहे. चंद्राचे भ्रमण वृषभ राशीतून होणार आहे. या राशीत गुरु ग्रह विराजमान आहे. चंद्र आणि गुरु यांच्या युतीने गजकेसरी योग जुळून येतो. या योगाचा अनेक राशींना उत्तम लाभ होऊ शकतो. लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

१५ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह कुंभ राशीत मार्गी होत आहे. कुंभ ही शनीचे स्वामित्व असलेली रास आहे. शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत असल्याने शश नामक राजयोग निर्माण झालेला आहे. याचा अनेक राशींना सकारात्मक अनुकूल प्रभाव दिसून येऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

तर नवग्रहांचा राजा सूर्य १६ नोव्हेंबर २०२४ रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. सुमारे महिनाभर सूर्य या राशीत असेल. आगामी काळ वृश्चिक संक्रांती म्हणून ओळखला जाणार आहे. सूर्याच्या वृश्चिक प्रवेशाचा अनेक राशींना फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. आर्थिक परिस्थिती वेळोवेळी बदलू शकते. गुरु कृपेने समाजात मान-सन्मान वाढू शकतो. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. करिअर क्षेत्रात फायदे मिळू शकतात. पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते.

वृषभ: कुटुंबासोबत वेळ चांगला जाऊ शकेल. वाहन आणि मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. करिअर क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. कामाची प्रशंसा होऊ शकते. समर्पण आणि मेहनत पाहून वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळण्याची पूर्ण शक्यता असते. भागीदारीत चालवलेल्या व्यवसायात नफा मिळू शकतो. देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो.

मिथुन: आर्थिक लाभासोबतच विविध क्षेत्रात यश मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. जीवनात आनंद येईल. करिअर क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. घेतलेल्या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रात फायदे मिळू शकतात. हा काळ सुवर्ण काळ असू शकतो.

कर्क: संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. गुरु कृपेने चांगले उत्पन्न कमवण्याची संधी मिळू शकते. बरेच फायदे मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रात बढती मिळू शकते. व्यवसायात फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसायात प्रवेश करू शकता. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.

सिंह: दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी होणारे चढ-उतार संपू शकतात. नोकरदार लोकांसाठीही हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते. थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे.

कन्या: शनी कृपेने जीवनातील समस्या दूर होऊ शकतात. एकाग्रता आणि ज्ञान वाढू शकते. बौद्धिक क्षमता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी खूप यश मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देऊ शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. वाहन, मालमत्ता, कपडे खरेदी करू शकता.

वृश्चिक: गजकेसरी योग काहीसा लाभदायक ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते. करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. करिअरमध्ये उच्च पदावर पोहोचण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात नफा मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला जाऊ शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.