गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 03:13 PM2024-06-29T15:13:13+5:302024-06-29T15:13:13+5:30

गजकेसरी योग हा अतिशय शुभ फलदायी मानला जातो. कोणत्या राशींवर शुभ प्रभाव दिसण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते? जाणून घ्या...

जुलै महिन्यात नवग्रहांपैकी महत्त्वाचे चार ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचे युती योग, राजयोग जुळून येणार आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला चंद्र वृषभ राशीत असणार आहे.

विद्यमान घडीला वृषभ राशीत गुरु ग्रह विराजमान आहे. त्यामुळे चंद्र आणि गुरुचा गजकेसरी नामक योग जुळून येणार आहे. गुरु आणि चंद्राचा गजकेसरी योग अतिशय शुभ तसेच राजयोगाप्रमाणे फले देणारा मानला जातो.

या योगाचा काही राशींना सर्वोत्तम संधींचा लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. करिअरमध्ये प्रगती, नोकरीत पदोन्नती, व्यापारात नफा, कुटुंबात आनंददायी घटना घडू शकतात, असे म्हटले जात आहे. कोणत्या ८ राशींवर शुभ प्रभाव दिसण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते? जाणून घेऊया...

मेष: कामांसाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यापारी वर्गाला सहकार्याचा अभाव सहन करावा लागू शकतो. यथाशक्ती दान करावे. शक्य असल्यास एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा. आरोग्याची काळजी घ्यावी. ध्यानधारणा योगासने करणे हिताचे ठरू शकेल.

वृषभ: व्यावसायिकांनी अडकलेले पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, शुभ ग्रहस्थितीमुळे पैसे मिळू शकतात. कलेचे कौतुक होईल. घरगुती कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कामाचा ताण कमी होण्याची शक्यता आहे. काम लवकर पूर्ण होऊ शकतात.

मिथुन: सक्रियपणे कामे करावी लागू शकतील. हलगर्जीपणा नुकसान करू शकतो. व्यापारी वर्गाने वडील, ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही बड्या निर्णयापर्यंत पोहोचणे टाळावे. जुन्या मित्राला भेटण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक मदत करावी लागण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहणे टाळा.

कर्क: करिअरशी संबंधित अडथळे दूर होऊ शकतील. चांगली डील मिळाल्याने व्यापारी वर्गाची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. गुंतवणुकीचे नियोजन करू शकतात. वर्कआउटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. शक्य असल्यास हनुमान चालीसा पठण करावी.

सिंह: प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. नोकरदारांची पदोन्नती किंवा बदली होऊ शकेल. नोकरीच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यात अधिक रस राहील. प्रिय जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील.

तूळ: धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी जाऊ शकते.

धनु: थोडी अधिक मेहनत करावी लागू शकेल. वेळेचे योग्य व्यवस्थापन करू शकलात तर, आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. बॉसकडून लाभ मिळू शकतात. फक्त त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. मैत्रिणीच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील.

कुंभ: महत्त्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न होऊ शकेल. नोकरदारांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन मिळू शकेल. धार्मिक कार्यात अधिक व्यस्त राहण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.