गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:20 PM2024-11-19T15:20:50+5:302024-11-19T15:28:37+5:30

चंद्राच्या भ्रमणामुळे काही शुभ योग जुळून येत असून, त्याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव राहू शकेल? जाणून घ्या...

नोव्हेंबरचा महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. चंद्राच्या भ्रमणामुळे गौरी योग जुळून येत आहे. तसेच बुध आणि सूर्याचा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. तसेच शनीचा शश नामक राजयोग जुळून आलेला आहे.

चंद्र आणि गुरुचा गजकेसरी योग आहे. तसेच २० नोव्हेंबर रोजी चंद्र कर्क राशीत असेल. त्यामुळे महालक्ष्मी योग जुळून येत आहे. कर्क राशीत मंगळ विराजमान असून, मंगळ आणि चंद्राचा युती योग जुळून येत आहे.

या सर्व योगांचा अनेक राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो. सकारात्मक अनुकूलता मिळू शकते. शिक्षण, नोकरी, करिअर, कुटुंब, व्यवसाय, बिझनेस, आर्थिक आघाडी या क्षेत्रांवर शुभ प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: बंपर लाभ मिळू शकतो. केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळेल. ध्येय साध्य करण्यासाठी अनेक योजना बनवू शकता. करिअरबाबत बोलायचे झाल्यास, बरेच फायदे मिळू शकतात. कामानिमित्त काही प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत स्थानबदल करू शकता. खूप फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता.

मिथुन: आनंद आणि सौभाग्य वाढेल. सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. व्यवसाय वाढवण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. दीर्घ काळापासून परदेशात करिअर करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांच्या मार्गात येणारा कोणताही अडथळा दूर होऊ शकतो. नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

कर्क: महालक्ष्मी राजयोग लाभदायक ठरू शकतो. करिअर आणि बिझनेसमध्ये फायदा मिळू शकतो. शेअर बाजारातून भरपूर पैसे कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. अन्य बरेच फायदे मिळू शकतात.

कन्या: महालक्ष्मी योगाचा खूप फायदा होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून भरपूर लाभ मिळू शकतात. मेहनतीच्या बळावर पुढे जाऊ शकाल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात फायदा होऊ शकतो. आर्थिक संकटातून सुटका मिळू शकते.

वृश्चिक: चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरदारांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना काही मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. दीर्घ काळानंतर नातेवाईकांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल.

मकर: गौरी महालक्ष्मी योग शुभ आणि यशकारक ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल. या काळात जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी-विक्रीशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यापारी लोकांचे पैसे बाजारातून अनपेक्षितपणे मिळू शकतील. एखाद्या योजनेत पैसे गुंतवू शकता ज्यामुळे भविष्यात मोठा लाभ मिळू शकेल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करतील. अचानक काही जबाबदारी येऊ शकते.

मीन: भाग्याची साथ लाभेल. सौभाग्य वाढेल. काही प्रभावशाली व्यक्ती समस्या सोडवेल. कुटुंबातील सदस्यांसोबत निर्माण झालेले मतभेद दूर होतील. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. अतिशय शुभ कालावधी राहू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. नोकरदारांसाठी काळ भाग्यकारक ठरू शकेल. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.