तुमच्या राशीनुसार धारण करा ‘ही’ ३ रत्ने; आहेत खूपच फायदेशीर; मिळेल अपार सुख-समृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 08:21 AM2022-05-26T08:21:31+5:302022-05-26T08:27:17+5:30

एखाद्या व्यक्तीच्या राशीनुसार, नवग्रहांशी संबंधित काही रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या...

प्रत्येक व्यक्तीच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. मात्र, आयुष्यातील किमान गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा आवश्यकच असतो. काही वेळा माणूस अपार कष्ट करूनही अपेक्षित पैसे मिळतातच असे नाही. कितीही कष्ट केले, तरी यश मिळत नाही. (Gem Stone Astrology)

पैसा हा मानवी जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी एखादी व्यक्ती आयुष्यभर झटत असते. सर्व सुख पैशांनी खरेदी करता येत नसली, तरी जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा हा लागतोच. घरातील सुख-समृद्धीसाठी आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रम करत असते.

परंतु काही वेळा कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीमुळे व्यक्तीला परिश्रम करूनही फळ मिळत नाही. अशा स्थितीत व्यक्तीला अनेकवेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

अशावेळी अनेक जण ज्योतिषशास्त्राचा आधार घेताना दिसतात. ज्योतिषशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले असल्याचे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात रत्नांना विशेष महत्त्व असल्याची मान्यता आहे. नवग्रहांशी संबंधित अनेक रत्ने सांगितली जातात.

व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी रत्न शास्त्रामध्ये काही रत्नांबाबत सांगण्यात आले आहे. या रत्नांना धारण केल्याने त्याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणती रत्ने धारण केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते, ते जाणून घेऊया...

रत्न शास्त्रात अशा अनेक रत्नांबाबत सांगण्यात आले आहे, जे खूप फायदेशीर आहेत. यापैकी एका रत्नाचे नाव जेड स्टोन आहे. ते धारण केल्याने माणूस आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतो. इतकेच नाही तर, हे रत्न धारण केल्याने व्यक्तीची कामाप्रती एकाग्रता वाढते आणि बौद्धिक विकासही होऊ शकतो.

जेड स्टोन पन्नाचा एक रत्न आहे, जो आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत करतो. या रत्नाच्या मदतीने व्यक्ती योग्य व्यावसायिक निर्णय घेऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढवण्यासाठी हे शुभ मानले जाते. वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्ती हे रत्न धारण करू शकतात.

टायगर रत्न हे रत्न शास्त्रामध्ये हे रत्न सर्वात वेगवान आणि सकारात्मक प्रभाव दाखवणारे मानले जाते. ते परिधान केल्याने व्यक्तीची प्रबळ इच्छाशक्ती वाढते.

तसेच ठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्यास सक्षम होते. असे मानले जाते की ते धारण केल्याने एखाद्या व्यक्तीला रखडलेल्या कामातही गती मिळते. मिथुन राशीच्या लोकांनी हे रत्न योग्य पद्धतीने धारण केले तर त्यांना शुभ परिणाम पाहायला मिळतात. तसे, कोणत्याही राशीचे लोक हे रत्न घालू शकतात, असे सांगितले जाते.

ग्रीन अ‍ॅव्हेंच्युरिन रत्न जेड स्टोन व्यतिरिक्त आणखी एक रत्न व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करते. ज्योतिष शास्त्रानुसार व्यापार्‍यांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.

हे रत्न धारण केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते. आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात. ग्रीन अ‍ॅव्हेंच्युरिन रत्न विशेषतः तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते.

सदर माहिती गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, आपल्यासाठी कोणते रत्न योग्य किंवा शुभ ठरू शकेल, याची माहिती घेण्यासाठी आपली जन्मकुंडली तज्ज्ञ व्यक्तींना दाखवून योग्य सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.