Girls Astrology: 'या' अद्याक्षरांच्या मुली नवऱ्याला 'मिठीत' ठेवण्याऐवजी 'मुठीत' ठेवणे पसंत करतात! By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 04:05 PM 2022-07-16T16:05:09+5:30 2022-07-16T16:12:26+5:30
Astrology: नावे आणि राशिचक्र चिन्हे यांच्यात खोल संबंध आहे. कारण हिंदू धर्मातील बहुतेक लोकांची नावे त्यांच्या राशीनुसार ठेवली जातात. राशीनुसार ठेवलेली नावे जास्त प्रभावी असतात असे म्हणतात. राशीचा प्रभाव मनुष्याच्या स्वभावावर पडतो आणि राशीच्या अद्याक्षरावरून ठेवलेल्या नावाने स्वभावाचाही अंदाज बांधता येतो. आज आपण अशा ३ अक्षरांबद्दल सांगणार आहोत ज्यावरून त्या मुलींचे नाव सुरू होते. या मुली जिद्दी, हट्टी, आक्रमक आणि नवऱ्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या असतात. थोडक्यात त्या नवऱ्याला मिठीऐवजी मुठीत ठेवणे अर्थात आपल्या धाकात ठेवणे पसंत करतात. जाणून घेऊया ती तीन आद्याक्षरे!
अ : बाराखडीची सुरुवात करून देणारे आद्याक्षर अ, यात नेतृत्वाचे गुण आपसुख येतात. पण नेतृत्त्वाला अहंकाराची लागण असेल तर अशा मुलींचा स्वभाव धाकदपटशा करणारा ठरतो. मात्र त्या प्रेमही तेवढेच करतात. त्यांना मनमानी करायला आवडते आणि जे त्यांचे ऐकत नाहीत त्यांना या मुलींचा राग सहन करावा लागतो.या मुली त्यांचे जीवन मुक्तपणे जगतात. त्यांना जे आवडते ते काम करतात. त्यांचा स्वभाव थोडा वरचढ असतो. ते त्यांच्या आवडीचा जोडीदार निवडतात. त्यांनी थोडासा तापट स्वभावाला आवर घातला तर त्यांचा नवरा मिठीतच काय तर मुठीतही आनंदाने राहायला तयार होईल!
च : ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते त्यांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी असते. दिसायला सुंदर पण शीघ्रकोपी स्वभाव. मात्र कर्तृत्त्वाची झळाळी एवढी की त्यांचे सर्वत्र वर्चस्व असते. त्यांच्या शब्दापुढे कोणाचे चालत नाही. यांच्या मनात असेल तर त्या समोरच्यावर जीव ओवाळून टाकतील आणि मनात नसेल तर ढुंकूनही बघणार नाहीत. अशा मुलींशी संसार करताना जोडीदाराला संयम बाळगावा लागतो. पण त्याच मुळे संसाराला आंबट, गोड, तिखट, तुरट अशा चटपट्या चवींचा स्वाद मिळतो आणि संसार खुमासदार होतो!
ल: या नावाच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि सासरच्या मंडळींनाही आनंदी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण एकदा का राग डोक्यात गेला किंवा कोणी मनाविरुद्ध वागले की त्या कोणालाही जुमानत नाहीत. त्यांना आपल्या माणसांवर हक्क दाखवायला आवडतो. अतिकाळजी, अतिप्रेम यामुळे जोडीदाराशी वाद विवाद होतात, पण या मुली सासर-माहेरच्या मंडळींना जीवापाड जपतात.
या तीन अद्याक्षरांना एकत्र केले तर अचल अर्थात आपल्या निश्चयावरून न हलणाऱ्या असा अर्थ निघतो. हा स्वभाव कमी जास्त प्रमाणात प्रत्येक स्त्री मध्ये असतो हे आपल्या लक्षात येईल. स्त्रियांना संसार सुख हातून निसटू नये याची साशंकता असल्याने धाकदपटशा दाखवून त्या सर्वांना प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवतात. आणि अशाच नात्यात राग, लोभ, प्रेम सर्व काही मिळू शकते. म्हणून त्यांच्या जोडीदारांनी मुठीत राहण्याची तयारी दाखवली तर मिठीत जागा मिळायला फार वेळ लागणार नाही हे निश्चित!