Guru Margi 2022 Effect : मीन राशीत गुरू मार्गी; 'या' ५ राशींना जॉब, करिअरमध्ये येऊ शकतात समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 06:52 PM2022-11-22T18:52:03+5:302022-11-22T18:57:19+5:30

२४ नोव्हेंबर रोजी सकाळी गुरू मीन राशीत मार्गी होणार आहे.

मीन राशीत असलेला गुरू २४ नोव्हेंबर रोजी मार्गस्थ होणार आहे. गुरू मार्गस्थ झाल्यानं काही राशींवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. गुरू मार्गस्थ झाल्याने तुळ सह काही राशींच्या लोकांच्या करिअर आणि कौटुंबीक जीवनात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच आर्थिक बाबतीतही काही समस्या निर्माण होऊ शकतात. पाहूया कोणत्या आहेत या राशी.

मेष - गुरू मार्गस्थ झाल्याने मेष राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. तसंच या कालावधीत अपेक्षेपेक्षा कमी लाभ मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान, नवा व्यवसाय सुरू करणं किंवा भागीदारी करणं तोट्याचं ठरू शकतं. या कालावधीत तुमच्या खर्चातही वाढ होईल.

मिथुन - या कालावधीत तुमच्या सहकाऱ्यांचा किंवा वरिष्ठांचं पूर्णपणे सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. नोकरी करणाऱ्यांवरही दबाव राहण्याची शक्यता आहे. कोणतीही नवी बिझनेस डील करताना सावध राहण्याची गरज आहे. तसंच या कालावधीत डील न केल्यास फायद्याचं ठरू शकतं. तुमच्या वैयक्तिक जीवनावरही याचा परिणाम होऊ शकतो.

सिंह - या कालावधीत कामाच्या ठिकाणी अधिक ताण राहण्याची शक्यता आहे. तसंच सहकाऱ्यांचं आणि वरिष्ठांचं सहकार्य मिळण्याची शक्यताही कमी आहे. आपल्या बजेटची या दरम्यान काळजी घ्या अन्यथा आर्थिक समस्या उद्भवू शकतात. या कालावधीत खर्चही वाढण्याची शक्यता आहे.

तूळ - हा काळ तुमच्यासाठी थोडा कठीण असू शकतो. यादरम्यान कामाचा तणावही अधिक राहू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांसोबत समस्यांना सामना करावा लागू शकतो. या कालावधीत उत्पन्नही कमी राहण्याची शक्यता आहे, परंतु खर्च वाढतील. पैशांची बचत करणं थोडं कठीण होईल.

धनु - या कालावधीत तुमच्यावर कामाचा भार अधिक वाढू शकतो. तसंच या कालावधीत व्यवसायात नुकसानही होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला कुटुंबीयांवरही अधिक खर्च करावा लागू शकतो. तसंच तुमच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होण्याचीही शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. तसंच कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्या.