Guru Pushya Yoga: २८ जुलैला गुरूपुष्य; जुळून येतोय शुभयोग, धनसंपत्तीसह मिळतील नाना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:27 PM2022-07-26T12:27:05+5:302022-07-26T12:34:34+5:30

Guru Pushya Yoga: २८ जुलै रोजी गुरू वक्री होणार आहेत. याच दिवशी गुरूपुष्य योग बनत आहे.

ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रे असून यामध्ये अभिजीत नक्षत्र हे स्वतंत्रपणे मोजले जाते. यापैकी एक नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र. या नक्षत्रावर शनि आणि गुरु या दोन्ही ग्रहांचा प्रभाव आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते. रविवार अथवा गुरूवारी हे नक्षत्र आल्यास ते खूप शुभ असते.

गुरूवार किंवा रविवार यापैकी एका दिवसात हे पुष्य नक्षत्र आल्यास एक दुर्मिळ योगायोग बनतो. यावेळी २८ जुलै गुरूपुष्य योग बनत आहे. हा योग २९ जुलै रोजीही काही काळासाठी राहिल.

२८ जुलै रोजी गुरू मीन राशीत वक्री होतील. याच दिवशी आषाढी अमावस्याही असेल. यासोबतच २८ जुलै रोजी एक अनोखा योगायोग बनेल. यादरम्यान कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी चांगली वेळ आहे. गुरू पुष्य धन आणि समृद्धीसाठी शुभ योग मानला जातो. या दिवशी जर तुम्ही सोनं, घर किंवा वाहन खरेदी करू इच्छित असाल तर शुभ मानले जाते.

२८ जुलै रोजी गुरू मीन राशीत वक्री होतील. याच दिवशी आषाढी अमावस्याही असेल. यासोबतच २८ जुलै रोजी एक अनोखा योगायोग बनेल. यादरम्यान कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी चांगली वेळ आहे. गुरू पुष्य धन आणि समृद्धीसाठी शुभ योग मानला जातो. या दिवशी जर तुम्ही सोनं, घर किंवा वाहन खरेदी करू इच्छित असाल तर शुभ मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार असा योग असल्यास जातकांना अत्यंत शुभ फळ मिळतं. २८ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी गुरू पुष्यामृत योगाचा प्रारंभ होणार असून तो २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल. ज्यावेळी गुरू वक्री होतील त्या कालावधीत गुरू पुष्यामृत योग बनेल.

वैदिक शास्त्रांमध्ये गुरू हा पुष्य नक्षत्राचा स्वामी मानला जातो. अशा स्थितीत गुरुवारपासून या नक्षत्राचा आरंभ होत असून त्यामुळे गुरु पुष्य योग होत आहे. हा गुरु पुष्य योग आषाढी अमावस्येला बनत असून त्यामुळे लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या व्यक्तीने या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय केले तर यश मिळण्याची शक्यता अधिक असते.

एवढेच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा अभ्यास सुरू करणे, घर बांधणे, नवीन काम सुरू करणे, नवीन व्यवसाय करणे, गुंतवणूक करणे इत्यादी खूप शुभ असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने तुम्हाला फायदा होईल. याशिवाय या दिवशी तांदूळ, मसूर, खिचडी, बुंदीचे लाडू इत्यादींचे सेवन करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते असेही म्हटले जाते.