बुधाचं सिंह राशीत गोचर, जाणून घ्या सर्व राशींवरील प्रभाव आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 03:27 PM2022-07-31T15:27:33+5:302022-07-31T15:59:21+5:30

बुध ग्रहाचं कर्क राशीतून सिंह राशीतील गोचरामुळे अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील.

बुध ग्रहाचं कर्क राशीतून सिंह राशीतील गोचरामुळे अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा ग्रह शिक्षण, व्यवसाय, शेअर बाजार, व्यक्तिमत्व, त्वचा आणि वाणीवर परिणाम करणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे सिंह राशीत बुधाच्या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.

काही राशींसाठी बुधाचे गोचर शुभ परिणाम आणू शकते, तर काही राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. २१ ऑगस्टपर्यंत बुध या सिंह राशीत राहिल आणि त्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल.

मेष - बुधाचं सिंह राशीत गोचर मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतं. या दरम्यान तुम्हाला कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रमानुसार स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. बुधवारचा उपवास तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो.

वृषभ - बुधाचे गोचर तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देऊ शकते. या कालावधीत, तुम्हाला करिअर आणि पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवण्यास सक्षम व्हाल आणि त्यांच्या सहकार्याने कार्य पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मुले आणि कुटुंबाकडून काही चांगली बातमी मिळेल. घरामध्ये तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याला पाणी अर्पण करा.

मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम असेल. या काळात तुम्ही स्वत:ला शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यात विशेष रस घ्याल. यासाठी तुम्ही खेळ, खेळ, व्यायाम अशा उपक्रमांमध्येही सहभागी होऊ शकता. हा काळ तुम्हाला तुमच्या भावंडांबद्दल खूप संवेदनशील बनवेल आणि तुम्हाला त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवायला आवडेल. तुमच्या उजव्या हाताच्या करंगळीत सोने किंवा चांदीत पाचू परिधान करणे चांगले ठरू शकते.

कर्क - बुध तुमच्या राशीतून सिंह राशीत गोचर करत आहे. या कालावधीत आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला यश मिळेल. उपाय म्हणजे या कालावधीत गरजूंना वस्तू दान करा.

सिंह - बुध तुमच्या राशीत गोचर करत असल्याने या कालावधीत तुमच्या साहस वाढेल. तसंच कोणताही निर्णय तुम्ही तेजीनं घ्याल. आपली कामंही यशस्वीरित्या पूर्ण करण्यास सक्षण असाल. तुम्ही गणरायाची पूजा करा आणि दुर्वा अर्पण करा.

कन्या - हा कालावधी कन्या राशीच्या लोकांसाठी विशेष शुभ ठरणार आहे. आयात निर्यात आणि परदेशातील व्यापाराशी निगडीत व्यक्तींना हा कालावधी उत्तम ठरेल. यादरम्यान, आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायामुळे परदेशवारीचेही योग संभवतात. आपल्या खोलीत इशान्य दिशेला एक हिरवी वस्तू ठेवा.

तूळ - हा कालावधी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतोय. कठीण कामांमध्येही तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रातही भाग्याची साथ मिळेल. व्यवसायातही उत्तम लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. शुभ फलप्राप्तीसाठी भगवान विष्णूच्या कथेचं पठण करा.

वृश्चिक - ज्यांना नोकरी बदलायची आहे अशा व्यक्तींसाठी हा कालावधी उत्तम ठरू शकतो. मित्रपरिवाराच्या मदतीनंही चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी गरजूंना आवश्यक वस्तूंचं दान करणं उत्तम ठरू शकतं.

धनु - या कालावधीत आपल्या धार्मिक ज्ञानाला महत्त्व देत तुम्ही काही तीर्थस्थळांना भेट देण्याच्या योजना आखू शकता. तुमची मेहनात आणि काम पाहून तुमचे वरिष्ठ कौतुकही करू शकतात. या कालावधीत घरात शुभकार्यही घडू शकते. बुधवारी दुर्गा चालीसाचं पठण करणं उपयुक्त ठरू शकते.

मकर - या कालावधीत तुम्हाला थोडी काळज घ्यावी लागेल. जर तुम्ही वाहन चालवत असाल तर अतिशय सावध राहून वाहन चालवा. या दरम्यान तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. या कालावधीत गरजूंना दान करणं उपयुक्त ठरू शकतं.

कुंभ - बुधाचं हे गोचर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं ठरणार आहे. या कालावधीत त्यांना लक्ष केंद्रित करण्यासही मदत मिळेल. कार्यक्षेत्रातही तुमच्या कामाची प्रशंसा होईल. बुधवारी कोणाला एखादी वस्तू भेट द्या.

मीन - या कालावधीत तुम्हाला करिअरमध्ये सावधानता बाळगणं आवश्यक आहे. खासगी जीवनातही काही तणाव निर्माण होऊ शकतो. वादाला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी हा कालावधी अनुकूल ठरेल. या कालावधीत नियमित रूपानं श्रीमद्भगवद्गीतेच पठण करा.