Jupiter Retrograde in Pisces : गुरू होणार वक्री, पुढील पाच महिने या राशींच्या लोकांसाठी कठीण काळ, बजेटही बिघडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 04:14 PM2022-07-21T16:14:27+5:302022-07-21T16:36:35+5:30

मीन राशीत असलेला गुरु २८ जुलै रोजी रात्री २ वाजून ९ मिनिटांनी वक्री होणार आहे. गुरूचे आपल्या राशीत वक्री होणं ही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घटना आहे.

मीन राशीत असलेला गुरु २८ जुलै रोजी रात्री २ वाजून ९ मिनिटांनी वक्री होणार आहे. गुरूचे आपल्या राशीत वक्री होणं ही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घटना आहे. गुरू सुमारे पाच महिने आपल्या राशीत वक्री राहिल. त्याचा आर्थिक बाबींवरही मोठा परिणाम दिसेल.

जगाच्या अर्थव्यवस्थेत घसरण, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल होण्यासारख्या काही घटना या कालावधीत घडू शकतात. इतकेच नाही तर मीन राशीत गुरू वक्की झाल्यमुळे अनेक राशीच्या लोकांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढणार असून यांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. मीन राशीत गुरू वक्री होण्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत अडचणी येऊ शकतात आणि कोणत्या राशींसाठी हा कालावधी उत्तमही ठरण्याची शक्यता आहे हे पाहुया.

मेष - या कालावधीत तुमच्या खर्चात वाढहोऊ शकते. परदेशात व्यापार करणाऱ्यांना एक चांगली डिल मिळू शकते. परंतु एकाग्रता आणि योग्य प्लानिंगनंतरच तुम्हाला यात यश मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत कुटुंबीयांच्या प्रकृतीची काळजी घ्या. तसंच जोडीदाराचीही तुमच्याबद्दल तक्रार येऊ शकते.

मिथुन - गुरू वक्री होत असल्यामुळे तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही समस्या निर्णाण होऊ शकतात. कोणाच्याही पाठी त्याच्याबद्दल वाईट बोलणंही टाळावं, यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. जर तुम्ही रोजगाराच्या शोधात असाल तर तुम्हाला अपडेट राहणं आवश्यक आहे. हा कालावधी तुम्हाला सामान्य जाऊ शकतो. तसंच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्या.

सिंह - या कालावधीत तुम्हाला अचानक काही बदल जाणवू शकतात. नोकरी करणाऱ्यांची अचानक बदलीही संभवते. या कालावधीत तुमचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. तसंच बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. सामाजिक स्तरावर अनेकांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. त्यातून लाभही संभवतो. वाहन चालवताना सावधानी बाळगा.

तूळ - तुम्ही शुभचिंतक समजणारीच लोकं तुमचा घात करू शकतात. त्यामुळे कामाशी काम ठेवा आणि कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता आपल्या गोष्टी इतरांना सांगू नका. आर्थिक बाजूबद्दलही तुळ राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.

मकर - या कालावधीत तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटण्याची शक्यता आहे. तुमच्याबद्दल लोकांच्या मनात चुकीची भावना तयार होऊ शकते. आपल्या विचारांमध्ये स्पष्टता ठेवण्याचा प्रयत्न करा. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका, त्यामुळे तुम्हाला नुकसान सोसावं लागू शकतं. पैशांची देवाणघेवाण करतानाही काळजी घ्या.

असं असलं तरी काही राशींसाठी मात्र हा कालावधी उत्तम ठरण्याची शक्यता आहे. वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा कालावधी चांगला ठरणार आहे. गुरू वक्री असला तरी हा कालावधी या राशीच्या लोकांसाठी सुखद आणि लाभदायक ठरणार आहे. या कालावधीत आर्थिक, सामाजिक बाबतीत या राशींच्या लोकांना हा कालावधी उत्तम ठरण्याची शक्यता आहे.