Surya Gochar 2023: २ शत्रू ग्रह एका राशीत: पिता-पुत्राचा संयोग, ‘या’ ४ राशींनी राहावे सावध; पडेल प्रतिकूल प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 01:33 PM2023-01-07T13:33:00+5:302023-01-07T13:37:03+5:30

Surya Gochar 2023: १४ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा सूर्य आणि शनीचा संयोग होईल.

१४ जानेवारीच्या संध्याकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत सूर्याच्या प्रवेशामुळे शनि आणि शुक्राचा संयोग होईल. हा एक दुर्मिळ संयोग आहे. अशा स्थितीत यावेळी मकर संक्रांतीला तयार होणारा सूर्य आणि शनीचा संयोग अत्यंत विशेष मानला जात आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीमध्ये सूर्य आणि शनीचा होणारा संयोग हा सिंह आणि तूळ राशीसह चार राशींसाठी अनुकूल नाही. या चार राशीच्या लोकांना या काळात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सिंह - सूर्याच्या मकर राशीतील गोचरादरम्यान आर्थिक स्थितीबाबत अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोणालाही पैसे उधारीवर देऊ नका. यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या कालावधीत मानसिक ताणही वाढू शकतो. कौटुंबीक जीवनातही वडिलधाऱ्या व्यक्तींसोबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घ्या.

तूळ - मकर राशीतील सूर्याचं गोचर तुमच्या कौटुंबीक जीवनात समस्या निर्माण करू शकतं. घरात काही वादही होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला थोडा ताण जाणवेल. या कालावधीत कोणत्याही प्रवासाला जात असाल तर अधिक काळजी घ्या. आई-वडिलांच्या तब्येतीचीही काळजी घ्या. या कालावधीत सरकारी कामात विलंब होऊ शकतो.

धनु - या कालावधीत तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. बोलताना कोणत्याही कठोर शब्दांचा वापर टाळा. वेळोवेळी रणनिती तयार करा आणि त्या गोपनीय ठेवा. कोणासोबतही त्याची चर्चा करू नका. या कालावधीत प्रकृतीची काळजी घ्या. तसंच डोळ्यांशी निगडीत समस्याही येऊ शकतात. कुटुंबीयांचीही काळजी घ्या.

कुंभ - सूर्याचं मकर राशीतील गोचरामुळे तुमच्या जीवनात चढ उतार येऊ शकतात. तुमच्यावर कामाचा तणाव राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुमचे खर्चही वाढतील. तसंच वादग्रस्त प्रकरणं सामंजस्याने सोडवण्याचे प्रयत्न करा. कोणालाही पैसे उधार देऊ नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.