Gudi Padwa 2022: २ एप्रिलपासून हिंदू नववर्षारंभ: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती; धनलाभाचा शुभ काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 07:50 AM2022-03-27T07:50:39+5:302022-03-27T07:54:44+5:30

Gudi Padwa 2022: आगामी नववर्ष अनेक राशीच्या व्यक्तींना यश, प्रगती आणि आनंद घेऊन येऊ शकेल. जाणून घ्या...

हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. आपण मराठी लोकांनी हा दिवस केवळ आनंदाचाच नव्हे, तर अभिमानाचा म्हणूनही साजरा केला पाहिजे. (Hindu New Year 2022)

हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सरनाम घेऊन येते. यंदाचे मराठी नववर्षाचे संवत्सर शुभकृत नाम संवत्सर असणार आहे. गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे. आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्यापैकी गुढीपाडवा हा एक शुभमूहूर्त मानला जातो. (Hindu New Year 2022 Astrology)

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंचांग आणि पंचांगस्थ गणपती पूजन केले जाते. मराठी नववर्षाची सुरुवात काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ, लाभदायक अन् फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. (Gudi Padwa 2022 Astrology)

नववर्षाचा आरंभ मेष राशीच्या व्यक्तींना नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकेल. वर्षाची सुरुवात मंगलमय ठरू शकेल. राशीस्वामी मंगळ आपली उच्चरास मकरेत विराजमान असणार आहे. याचा लाभ मेष राशीच्या व्यक्तींना होऊ शकेल. आर्थिक आघाडी चांगली राहू शकेल. जोडीदाराकडून लाभ मिळू शकतो. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना यशकारक काळ ठरू शकेल. मात्र, वास्तविक गोष्टी स्वीकारून त्यानुसार कार्यरत राहणे उपयुक्त ठरेल.

नववर्षाचा आरंभ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ ठरू शकतो. नववर्षात मिथुन राशीच्या व्यक्तींना शनी देवाच्या ढिय्या प्रभावापासून मुक्ती मिळू शकेल. गेल्या काही वर्षांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे चीज होऊ शकेल. कार्यक्षेत्रात पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकते. नवीन रोजगार तसेच नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकतील. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी.

नववर्षाचा आरंभ कन्या राशीच्या व्यक्तींना प्रगतीकारक ठरू शकतो. एकाग्रता वाढू शकेल. नवीन लोकांची ओळख होऊ शकेल. जनसंपर्क वाढू शकेल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकेल. आर्थिक आघाडीवर वृद्धि पाहायला मिळू शकेल. तीर्थाटनाला जाऊ शकेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. घराबाहेर राहून नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकेल. जमीन, मालमत्ता खरेदीचे व्यवहार यशस्वी ठरू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

नववर्षाचा आरंभ वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संकटमुक्तीचा ठरू शकेल. अडचणी, समस्या दूर होऊ शकतील. अडकलेली कामे मार्गी लागू शकतील. भागीदारीतील व्यवसाय, व्यापार, उद्योग यातून लाभ मिळू शकतील. दाम्पत्य जीवनातील सकारात्मकता वृद्धिंगत होऊ शकेल. विद्यार्थी वर्गाला गुरुजनांचे सहकार्य लाभू शकेल. कार्यालयातील सहकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळू शकेल.

नववर्षाचा आरंभ धनु राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. निर्णय क्षमता वाढीस लागेल. कुटुंबात मंगल कार्याची योजना होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांशी योग्य ताळमेळ होऊ शकेल. दाम्पत्य जीवनात मधुरता येऊ शकेल. मात्र, सामाजिक स्तरावर मानहानीचा सामना करावा लागू शकतो. ध्यानधारणा, योगसाधना करणे उपयुक्त ठरेल. आरोग्य उत्तम राहू शकेल. पराक्रमात वाढ होऊ शकेल.

नववर्षाचा आरंभ मकर राशीच्या व्यक्तींसाठी यशकारक ठरू शकेल. केलेल्या मेहनतीचे चीज होऊ शकेल. राजकीय क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना लाभदायक कालावधी. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करणे उपयुक्त ठरू शकेल. यश, प्रगतीचे मार्ग साध्य करू शकाल. वडिलांकडून लाभ मिळू शकतील. अडकलेली कामे मार्गी लागू शकतील. जुन्या रोगापासून मुक्ती मिळू शकेल.