गुरु-सूर्याची महायुती: ‘या’ ५ राशींना भरघोस लाभ, दुर्मिळ योगाने अपार यश; ३० दिवस शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 01:44 PM2023-02-07T13:44:20+5:302023-02-07T13:53:11+5:30

गुरु आणि सूर्य मित्र ग्रह मानले जातात. या दोन्ही ग्रहांचा शुभ योग काही राशींना भरभराट, समृद्धी प्रदान करू शकतो, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार आगामी काळात अनेक शुभ योग जुळून येत आहेत. बुध, शुक्र, सूर्य यांचे होणारे राशीपरिवर्तन महत्त्वाचे मानले गेले आहे. फेब्रुवारी महिन्यात नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत शनी विराजमान आहे. त्यामुळे सूर्य आणि शनीची युती होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनी हे शत्रू ग्रह मानले जातात.

कुंभ राशीत सूर्य सुमारे महिनाभर विराजमान असेल, त्यानंतर मार्च महिन्याच्या मध्यात सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करेल. नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह स्वराशीत म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशाने गुरु आणि सूर्याचा दुर्मिळ शुभ योग जुळून येणार आहे.

गुरु आणि सूर्य मित्र ग्रह मानले जातात. या दोन्ही ग्रहांच्या शुभ योगाचा काही राशीच्या व्यक्तींना चांगला लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना सूर्य आणि गुरुच्या शुभ योगाचा फायदा होऊ शकेल? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि गुरुचा दुर्मिळ योग उत्तम ठरू शकेल. या काळात कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांची मने जिंकू शकाल. तुमचा आदर वाढेल. तुम्हाला चांगली बढती मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढणार आहे. आत्मविश्वासात वाढ होऊ शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि गुरुचा दुर्मिळ योग चांगला ठरू शकेल. उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे. सूर्य आणि गुरु भरपूर लाभ देतील. या काळात फायदा होऊ शकेल. भावांकडूनही चांगले सहकार्य मिळेल. एखादी कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर मित्रांच्या मदतीने तुम्ही नोकरी बदलू शकाल.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि गुरुचा दुर्मिळ योग यशकारक ठरू शकेल. करिअर आणि व्यवसायात फायदा होऊ शकेल. या काळात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. रोखीचे व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा होऊ शकतो.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि गुरुचा दुर्मिळ योग सकारात्मक ठरू शकेल. हा योग यश आणि समृद्धी देईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सकारात्मक परिणाम मिळतील. परदेश दौऱ्यावर जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि गुरुचा दुर्मिळ योग लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल. संपत्तीत वाढ होईल. संभाषणातून इतरांना प्रभावित करू शकाल. बढती आणि वेतन वृद्धी होण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसेही मिळू शकतील.

एप्रिल महिन्यात गुरु मीन राशीतून मेष राशीत जाणार आहे. हे मोठे राशीपरिवर्तन मानले जात आहे. एप्रिल महिन्यात सूर्यही मेष राशीत प्रवेश करेल. त्यामुळे पुन्हा एकदा मीन राशीनंतर मेष राशीत या गुरु-सूर्याचा शुभ योग जुळून येऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.