Guru Chandal Yoga: गुरु चांडाळ योग संपला, 'या' राशीच्या लोकांसाठी उघडणार नशिबाचे द्वार! By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 02:16 PM 2023-06-22T14:16:04+5:30 2023-06-22T14:19:16+5:30
Guru Chandal Yoga Samapti 2023: या वर्षी एप्रिलमध्ये देवगुरु बृहस्पतीने मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश केला आहे आणि १ मे २०२४ पर्यंत मेषमध्येच मुक्काम राहणार आहे. दुसरीकडे, क्रूर ग्रह राहू आधीच मेष राशीत जाऊन बसला आहे आणि ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत मेष राशीत राहणार आहे. मेष राशीत गुरु आणि राहूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योग तयार झाला. नुकतेच २१ जून रोजी गुरूने नक्षत्र बदलून भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. गुरुचे नक्षत्र बदलताच गुरु चांडाळ योग संपतो. त्यामुळे ४ राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेष राशीत तयार झालेला गुरु चांडाल योग संपल्यामुळे या राशींचे नशिबाचे दार खुले झाले आहे असे म्हणता येईल. चला जाणून घेऊया की गुरु राहूच्या युतीमुळे तयार झालेल्या गुरु चांडाळसारख्या अशुभ योगाचा शेवट कोणत्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असेल.
मिथुन: गुरु राहू चांडाळ योग समाप्त झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. या लोकांच्या नोकरी-व्यवसायात मोठा लाभ होईल. प्रगती होईल, उत्पन्न वाढेल. जुनी गुंतवणूक लाभ देईल. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
सिंह : गुरु-राहूचा चांडाल योग संपल्याने सिंह राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागतील. नवीन कामात यश मिळेल. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
कर्क : गुरु-राहू चांडाळ योगाचा शेवट कर्क राशीच्या लोकांना खूप काही देईल. समाजात मान, पद, प्रतिष्ठा आणि भाग्य वाढेल. अचानक धनलाभ होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.
धनु: गुरु चांडाळ योगाची समाप्ती धनु राशीच्या लोकांना करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंधात लाभ देईल. तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. जोडीदारासोबत प्रेम वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील ज्या फायदेशीर ठरतील. गुंतवणुकीत यश मिळेल.