षष्ठग्रही ६ राजयोगात गुरुवारी प्रदोष: ६ राशींवर धनलक्ष्मी कृपा, सर्वोत्तम काळ; शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:32 IST2025-04-09T15:20:43+5:302025-04-09T15:32:49+5:30

गुरुवारी प्रदोष व्रत असून, सहा ग्रह एकाच राशीत असल्याने जुळून आलेल्या विविध राजयोगांचा कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, भरघोस फायदा प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या...

गुरुवार, १० एप्रिल २०२५ रोजी प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी गुरुवारी येते, तेव्हा त्याला गुरु प्रदोष व्रत असे म्हटले जाते. तसेच गुरु प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी तसेच गुरुबळ, गुरुकृपा लाभण्यासाठी गुरु ग्रहाच्या संदर्भात मंत्रांचे जप, उपासना, दान करावे, असे सांगितले जाते.

आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनि, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन या सहा ग्रहांचा षष्ठग्रही योग जुळून आला आहे. या ग्रहांच्या गोचरामुळे आणि युती योगांमुळे विविध प्रकारचे ६ राजयोग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. तसेच कन्या राशीतील केतु ग्रहाशी या सहाही ग्रहांचा समसप्तक योग जुळून आला आहे. तर कर्क राशीतील मंगळ ग्रहाशी नवमपंचम योग जुळून आलेला आहे.

गुरुवारी दत्तगुरू, स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. गुरुबळ मिळावे आणि गुरुकृपा लाभावी, यासाठी नामस्मरण, उपासना केल्या जातात. गुरुवारी प्रदोष आल्याने महादेवांचेही विशेष पूजन करून कृपा मिळवण्याची उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्या राशींवर याचा शुभ प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

मेष: चांगली बातमी कळेल. घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. महागड्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. योग्यतेची दखल घेतली जाईल. चांगली संधी मिळेल. प्रवासाचा बेत ठरेल. मन आनंदून जाईल. नवीन शिकण्यासाठी वेळ द्याल. मनात कल्पक विचार राहतील. चंद्र-केतू युतीमुळे काही अडचणी येतील.

वृषभ: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. व्यावसायिक करारमदार होतील. मात्र, मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घर, जमीन खरेदी कराल. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. विविध प्रकारचे लाभ होतील. मुलांची काळजी घ्या. प्रवासात सतर्क राहा.

मिथुन: धनलाभ होईल. योजना लोकांना आवडतील. लोक मदत करण्यासाठी पुढे येतील. आर्थिक लाभ होईल. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. एखादे अडलेले काम अनपेक्षितपणे मार्गी लागेल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील.

कर्क: मनावरील दडपण निघून गेल्याने स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. मनात नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. चंद्र भ्रमणामुळे अनेक चांगले अनुभव येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल.

सिंह: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. कामाचा ताण राहील. थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. लोकांना आश्वासने देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. पैशाचा ओघ सुरू राहील. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा.

कन्या: शुभ फळे मिळतील. लाभाचे प्रमाण वाढते राहील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. घाईघाईत कामे करू नका. कायद्याची बंधने पाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाचा ताण कमी होईल. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील.

तूळ: पाहुणे मंडळी येतील. अनेक चांगले अनुभव येतील. नोकरीत मोठी संधी मिळू शकते. महत्त्व वाढेल. पगारवाढ मिळेल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. अनेक उत्तम लाभ होतील. भेटवस्तू प्राप्त होतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. थोडे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. चंद्र-केतू युतीमुळे थोडे सावधपणे वागा. प्रवासात अनोळखी लोकांपासून सतर्क राहा.

वृश्चिक: भाग्याची चांगली साथ राहील. मोठ्या योजना आखल्या जातील. आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होईल. लोक कामाची प्रशंसा करतील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. एकंदरीत अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत नवीन संधी मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. भविष्य, आर्थिक आवक चांगली राहील.

धनु: काही अडचणी असतील. एखाद्या कामात व्यस्त राहाल. दगदग होईल, अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. वाहन जपून चालवा. अचानक धनलाभ होऊ शकतो. ग्रहस्थिती फायदेशीर ठरेल. एखादी चांगली बातमी कळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. भेटीगाठी फलद्रुप होतील. नावलौकिक वाढेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल.

मकर: व्यवसायात भरभराट होईल. मनात उत्साह राहील. मोठे प्रकल्प हाती घेतले जातील. एखादी नवीन कल्पना विकसित कराल. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. अष्टम स्थानातून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे सावधपणे वागण्याची गरज आहे. अडचणी येतील. वाहन जपून चालवा.

कुंभ: आरोग्य, विरोधक या बाबतीत सावध राहा. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता बाळगली पाहिजे. अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. धनस्थानातून होणाऱ्या सहा ग्रहांच्या युतीमुळे शुभ फळे मिळतील. शुक्रवार, शनिवार थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा.

मीन: ग्रहमान अनुकूल राहील. मात्र, बेफिकीर वृत्तीने वागून चालणार नाही. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. महत्त्वाचे निरोप येतील. मुले प्रगती करतील. संयम बाळगण्याची गरज आहे. काही लाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. नशिबाचा कौल बाजूने राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.