गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 02:00 PM 2024-11-27T14:00:58+5:30 2024-11-27T14:12:14+5:30
गुरु प्रदोषाच्या दिवशी महादेवांसह दत्तगुरु, स्वामींचे पूजन तसेच गुरु ग्रहाशी संबंधित उपाय करणे शुभ लाभाचे मानले जाते. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... नोव्हेंबर महिन्याची सांगता होताना प्रदोष आणि शिवरात्रि व्रत येत आहे. ही दोन्ही व्रते महादेव शिवशंकरांना समर्पित आहेत. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदोष व्रत आहे. त्रयोदशी तिथीला हे व्रत केले जाते. ज्या वारी प्रदोष असतो, तो दिवस त्या नावाने ओळखला जातो. नोव्हेंबर महिन्यातील प्रदोष व्रत हे गुरुवारी येत असल्याने याला गुरु प्रदोष असे म्हटले जाते.
प्रदोष व्रत शंकराला समर्पित असल्याचे मानले जाते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते.
गुरु प्रदोषाच्या दिवशी महादेव शिवशंकर यांच्यासोबत गुरु ग्रहाशी संबंधित जप, दान केल्यास गुरुबळ पाठीशी राहण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते. तसेच गुरु ग्रहाचा प्रतिकूल परिणाम कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. याशिवाय गुरुवार असल्याने दत्तगुरू, स्वामींचे केलेले विशेष पूजन लाभदायक ठरू शकते. गुरु प्रदोष याचा मेष ते मीन या सर्व राशींवर कसा प्रभाव असू शकेल, ते जाणून घेऊया...
मेष: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. कार्यक्षेत्रात अतिशय खंबीरपणे निर्णय घ्याल. काही लोक नाराज होतील. मनात उत्साह राहील. खाण्यापिण्याचे पथ्य पाळले नाही तर आरोग्याची समस्या येऊ शकते. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. मात्र, जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. अचानक धनलाभ होऊ शकतो.
वृषभ: संयमाची परीक्षा पाहिली जाईल. त्यात उत्तीर्ण झालात तर तुमचा आत्मविश्वास दुणावेल. नोकरीतील तणावाचे व्यवस्थापन नीट करा. वरिष्ठांशी जुळवून घेणे योग्य राहील. नातेसंबंधात कटुता जेवढी टाळाल तेवढे चांगले राहील. थोड्या फायद्यासाठी लाखमोलाची नाती दुरावली जाणे केव्हाही चांगले नाही, हे विसरता कामा नये. आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांशी संवाद ठेवा. गोपनीय माहिती विरोधकांच्या गोटात जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
मिथुन: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. व्यवसायात भरभराटीचा काळ अनुभवायला मिळेल. सतत व्यस्त राहाल. मालाची विक्री चांगली होईल. बाजारपेठेचा अभ्यास करून मोठी गुंतवणूक करावी. नोकरीत काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. सबुरीने वागण्याची गरज आहे.
कर्क: चांगल्या संधी चालून येतील. सुरुवातीला दमदार यश मिळेल. मनात आत्मविश्वास राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. यशस्वीपणे पूर्ण कराल. मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्याशी संवाद साधा. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी लोकांपासून सावध राहा. भावंडांशी गैरसमज होतील. घरी पाहुणे मंडळी येतील.
सिंह: मनात आत्मविश्वास राहील. मोठे प्रकल्प हाती घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी योजना आखाल. लोकांची चांगली साथ मिळेल. जवळच्या नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. भावंडांशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात असणाऱ्यांच्या योजनांच्या बाबतीत गतिमान हालचाली होतील. मनात उत्साह राहील. गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल.
कन्या: काही अडचणी असतील. त्या लगेच दूर होतील. सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. पैशांचा ओघ सुरू राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. जवळच्या प्रवासात थोडे सतर्क राहा. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी.
तूळ: लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. अनोळखी लोकांना खाजगी माहिती देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनात आध्यात्मिक विचार राहतील. परिस्थिती आटोक्यात येईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. जवळच्या लोकांशी संवाद ठेवा.
वृश्चिक: यशदायक काळ आहे. नोकरीत सुरुवातीला थोडा ताण जाणवेल. वरिष्ठांशी जुळवून घेतल्यास आणि कामावर लक्ष केंद्रित केल्यास परिस्थिती आटोक्यात येईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. ओळखीचे फायदे होतील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. पैसा मिळाला तरी व्यवहार जपून करा.
धनु: चांगल्या बातम्या कळतील. त्यामुळे उत्साह वाढेल. समाजात मान वाढेल. नशिबाचा कॉल बाजूने राहील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मानसन्मान प्राप्त होईल. कामाचा ताण राहील. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य राहील. एखाद्या नवीन कामासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. घरात किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सफलता मिळणे सुरू होईल.
मकर: कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. काही अडचणी असतील. शांत चित्ताने कामे करत राहा. वाहन जपून चालवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. हळूहळू परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. घरी पाहुणे मंडळी येतील. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. एखादी जवळची व्यक्ती विश्वासाला तडा देऊ शकते. क्रोधाला आवर घातला पाहिजे.
कुंभ: सावधपणे वागण्याची गरज आहे. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. भाग्याची चांगली साथ मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. घरी पाहुणे मंडळी येतील. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा.
मीन: काही सकारात्मक परिणाम दिसून येतील. त्यातल्या त्यात नोकरी, व्यवसायात परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रत्येक काम झालेच पाहिजे असा अट्टहास करू नका. काही कामात अडथळा येईल तर काही कामे विलंबाने होतील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.