गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 11:46 AM2024-11-01T11:46:59+5:302024-11-01T11:56:21+5:30

गुरु आणि शुक्राच्या राजयोगाने काही राशींना दिवाळीनंतरही अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. या महिन्याची सुरुवातीलाच लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज येत असल्याचे याला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात चातुर्मासाची सांगता होत आहे. तसेच कार्तिकी एकादशी, त्रिपुरारी पौर्णिमा यांसह अन्य अनेक सण, व्रते या महिन्यात साजरी केली जाणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यात शुक्र आणि सूर्य हे दोनच ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. विद्यमान स्थितीत शुक्र ग्रह वृश्चिक राशीत आहे. त्यामुळे वृषभ राशीतील गुरु ग्रहासोबत समसप्तक योग जुळून आला आहे. या योगाचा दिवाळीत काही लोकांना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

०६ नोव्हेंबर रोजी शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. तर आताच्या घडीला गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे गुरु आणि शुक्राचा परिवर्तन राजयोग जुळून येणार आहे. समसप्तक योग आणि परिवर्तन राजयोगाचा अनेक राशींना दुपटीने सकारात्मक अनुकूलता प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: गुरु आणि शुक्राचा राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. प्रलंबित पैसे मिळू शकतात. नवीन काम करण्याची संधी मिळू शकेल. चांगला नफा मिळू शकेल. नोकरदार लोक प्रगती करतील. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल.

वृषभ: गुरु आणि शुक्राचा राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. मनोकामना पूर्ण होऊ शकतात. लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आगामी काळ कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत घालवू शकणार आहात. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन: उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. नवीन प्रयोग चांगला नफा कमवण्याची संधी ठरू शकेल. नियोजित योजना यशस्वी होतील. तसेच जे नोकरीत बढतीची वाट पाहत आहेत, त्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.

कर्क: सकारात्मक परिणाम मिळू शकतील. विचार खुलेपणाने शेअर करावे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी मिळू शकतील. यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी काळ महत्त्वाचा असणार आहे. काही नवीन लोकांशी संबंध निर्माण होऊ शकतात.

सिंह: कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाकडे अधिक लक्ष द्याल. घरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी काळ चांगला आहे. मानसिक शांतता आणि स्थिरता यावर लक्ष केंद्रित करून कोणत्याही तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असाल. नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना थोडा संयम ठेवावा लागेल. लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. वास्तुशास्त्र किंवा मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जे रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचे नाते अधिक घट्ट होतील.

कन्या: गुरु-शुक्राचा राजयोग फायदेशीर ठरू शकतो. भविष्यात चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करावे लागू शकतात. अडकलेले पैसे मिळू शकतात. विवाहितांच्या कौटुंबिक जीवनात गोडवा राहील. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात.

धनु: गुरु आणि शुक्राचा राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या काळात व्यवसायात पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतील. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्याची संधी मिळणार आहे. वैयक्तिक जीवन आनंददायी राहील. चांगले दिवस सुरू होऊ शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळू शेकेल. समाजात लोकप्रिय व्हाल. मान आणि प्रतिष्ठा मिळेल.

मकर: सामाजिक संबंधांवर विशेष लक्ष द्यावे. इच्छा पूर्ण होऊ शकेल. नोकरी करणारे महत्त्वाची भूमिका बजावतील. नेतृत्व कौशल्याची प्रशंसा केली जाईल. आर्थिक बाबतीत हा काळ चांगला जाणार आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. जोडीदारासोबतच्या नातेसंबंधात परस्पर समंजसपणा आणि सुसंवाद राखल्यास अधिक चांगले होईल.

कुंभ: कारकीर्द, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थितीत प्रगतीचा काळ असेल. कठोर परिश्रम आणि समर्पणाचे कौतुक केले जाईल. काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ फलदायी राहील. नवीन गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ असू शकेल. नवीन उत्पन्नाच्या स्रोतांचा फायदा होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.