गुरु-सूर्य-मंगळाचा विशेष योग: ६ राशींची चांदी, नवीन नोकरीची संधी; बक्कळ फायदा, शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:07 IST2025-01-14T12:01:48+5:302025-01-14T12:07:31+5:30

गुरु, सूर्य आणि मंगळ यांचा जुळून येत असलेला योग विशेष मानला जात असून, तो काही राशींना शुभ फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मकर राशीत विराजमान होत आहे. सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. सूर्याच्या त्या राशीतील संक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. एखाद्या राशीत सूर्य एक महिना विराजमान असतो. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मंगळ ग्रहाशी प्रतियुती योग जुळून येत आहे.

तसेच नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह आणि नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ यांचा अर्धकेंद्र योग जुळून येत आहे. गुरु ग्रह आताच्या घडीला वृषभ राशीत विराजमान आहे. २०२५ मध्ये गुरुचे राशीपरिवर्तन असून, ते महत्त्वाचे मानले गेले आहे.

गुरु, सूर्य आणि मंगळ यांचा जुळून येत असलेला योग विशेष मानला जात असून, तो काही राशींना शुभ फलदायी ठरू शकतो, असे मानले जाते. हे दोन्ही योग १२ जानेवारी आणि १४ जानेवारी २०२५ पासून जुळून येणार आहेत. कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल? ते जाणून घेऊया...

मेष: अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकतो. सकारात्मक यश मिळू शकते. आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायात नशीबाची साथ मिळू शकते. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. परदेशातून चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

कर्क: गुरु आणि मंगळाचा अर्धकेंद्र योग आनंददायी ठरू शकतो. प्रयत्नांमधून यश मिळू शकते. कामाचे कौतुक होऊ शकते. प्रगतीची शक्यता आहे. व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. व्यापारातून नफा मिळवता येऊ शकेल. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.

सिंह: गुरु-मंगळाचा अर्धकेंद्र योग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे असेल. नोकरीसाठी ठिकाण बदलावे लागू शकते. पण यातून खूप फायदे मिळू शकतात. व्यवसायात प्रोफेशनली काम केले तर नफा कमवू शकता. परंतु, काळजीपूर्वक खर्च करा.

कन्या: प्रतियुती योगात आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतात. अचानक वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या संदर्भात प्रवास करावे लागू शकतात. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. अचानक आर्थिक फायदा, धनलाभ होऊ शकतो. अधिकाधिक पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता.

तूळ: सूर्य आणि मंगळाचा प्रतियुती योग फायदेशीर ठरू शकतो. भौतिक सुख मिळू शकते. सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. करिअरच्या क्षेत्रात यश मिळू शकते. नफा मिळू शकतो. व्यवसायातील धोरण प्रभावी ठरू शकते. अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. बचत करू शकाल. गुरु-मंगळाचा अर्धकेंद्र योगामुळे विविध लाभ, फायदे मिळू शकतात. आत्मविश्वास वाढू शकेल. गुरुमुळे जीवनात आनंद, सकारात्मकतेचा अनुभव घेऊ शकाल.

धनु: सूर्य आणि मंगळाचा प्रतियुती योग शुभता घेऊन येणारा ठरू शकेल. सूर्य देवाच्या कृपेने नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी जलद प्रगती होऊ शकते. व्यस्त वेळापत्रकातून स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील प्रयत्नांमधून बरेच यश मिळू शकते. पैसे हुशारीने खर्च केले तर उत्पन्नात वाढ दिसून येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.