गुरुपुष्यामृत योगाला गुरुदर्शन: ‘या’ १० राशींचा भाग्योदय, यश-धनलाभ; गुरुकृपेने शुभच होईल! By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 02:38 PM 2023-04-27T14:38:25+5:30 2023-04-27T14:57:45+5:30
guru uday in mesh rashi on gurupushyamrut yoga 2023: गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धी-अमृत योग जुळून आले असून, हे गुरुदर्शन कोणत्या १० राशींना शुभ फलदायी ठरू शकेल? जाणून घ्या... सन २०२३ मधील गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. विशेष म्हणजेच याच दिवशी नवग्रहांचा गुरु बृहस्पति गुरु ग्रह मेष राशीत उदय होणार आहे. ३१ मार्च रोजी गुरु स्वराशीत म्हणजेच मीन राशीत असताना अस्तंगत झाला होता. अस्तंगत अवस्थेत असताना गुरु मेष राशीत विराजमान झाला. यानंतर आता सुमारे २७ दिवसांनी गुरु मेष राशीत उदय होत आहे. गुरु ही पुष्य नक्षत्राची देवता मानली गेली आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर होणारे गुरुदर्शन शुभ फलदायी मानले गेले आहे. (guru uday in mesh rashi on gurupushyamrut yoga 2023)
एखादा ग्रह सूर्याच्या जवळ असला की तो पृथ्वीवरून दिसेनासा होतो, तेव्हा तो ग्रह अस्तंगत झाला असे म्हटले जाते. गुरु अस्तंगत स्थितीत मेष राशीत तसेच अश्विनी नक्षत्रात विराजमान झाला. आता गुरु आणि सूर्य लांबच्या अंशावर गेल्यामुळे गुरु पृथ्वीवरून दिसेल. यालाच गुरुचा उदय म्हटले जात आहे. गुरुचा उदय हा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. मेष राशीत झालेले गुरुदर्शन गुरुवारी आणि गुरुपुष्यामृत योगावर होणे शुभ मानले जात आहे. (jupiter rise in aries 2023)
गुरु अस्तंगत असताना शुभ कार्ये केली जात नाहीत. आता गुरु उदय झाल्यावर पुन्हा एकदा शुभ कार्यांना प्रारंभ होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. या गुरुपुष्यामृत योगावर मेष राशीत गुरु, सूर्य, बुध आणि राहुचा चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. तसेच गुरु आणि चंद्राचा गजकेसरी योगही जुळून येत आहे. याशिवाय सर्वार्थ सिद्धी योग, अमृत योगही जुळून येत आहेत. या अद्भूत योगांचा कोणत्या १० राशींना अपार लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...
मेष राशीत गुरुपुष्यामृत योगावर गुरुदर्शन होत आहे. तसेच अनेकविध प्रकारचे अद्भूत शुभ योग जुळून येत आहे. या राशीच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकेल. व्यावसायिकांना आज ओळखीच्या व्यक्तींद्वारे भरपूर नफा मिळू शकतो. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ मजेत घालवता येऊ शकेल. मात्र, कार्यालयातील हितशत्रूंपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन यशकारक ठरू शकेल. मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न होऊ शकेल. घरातील वातावरणही शांत राहू शकेल. व्यावसायिकांना वेळेचा सदुपयोग ज्ञान, माहिती मिळवण्यासाठी करता येऊ शकेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा, त्यानंतरच पुढे जावे. व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नवीन ओखळी होऊ शकतील. कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहू शकतील.
मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन काहीसे संमिश्र ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांची चिंता वाटू शकेल. कामात व्यस्तता राहील. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून व्यवसाय शिखरावर नेऊ शकता. आर्थिक स्थिती मध्यम राहू शकेल. कालांतराने नफा मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो.
कर्क राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन अनुकूल ठरू शकते. नातेवाईकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मुलांच्या प्रगतीतून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसे खर्च होऊ शकतात. कुटुंबातील वरिष्ठांशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. मतभेद वाढू देऊ नयेत.
सिंह राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन दिलासादायक ठरू शकेल. अनेक दिवसांपासून सामना करावा लागत असलेल्या समस्यांतून मार्ग निघताना दिसू शकेल. मात्र, कौटुंबिक मतभेदांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा व्यावहारिक विचार सुधारेल. गुंतवणुकीचा विचार लांबणीवर टाकल्यास बरे होईल. अन्यथा भविष्यात नुकसान सहन करावे लागू शकते. योग प्राणायामाचा सराव हितकारक ठरू शकेल.
कन्या राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन काहीसा संमिश्र ठरू शकतो.नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल, तर काही काळ थांबा. नोकरदारांना त्यांच्या नोकरीत राहण्याचा सल्ला दिला जातो. वडिलोपार्जित मालमत्तेचे काम तूर्तास थांबवणे चांगले राहील. अन्यथा नवीन समस्या उद्भवू शकते. घरातील सुखसोयींचा पुरेपूर वापर कराल. नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात संयम राखणे फायदेशीर ठरू शकेल.
तूळ राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन सकारात्मक ठरू शकेल. राजकारणाशी निगडित लोकांसाठी आगामी काळ खास ठरू शकेल. नातेवाईकांशी आनंददायी भेटी होऊ शकतील. चांगली बातमी मिळाल्याने आनंद होईल. जवळच्या मित्राच्या मदतीने अडकलेले काम मार्गी लावू शकता. विद्यार्थ्यांना मेहनतीचे यशकारक फळ मिळू शकेल. कौटुंबिक, कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या समस्यांतून दिलासा मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन अनुकूल ठरू शकते. कामात सुधारणा होऊ शकेल. एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल. आर्थिक आघाडी सामान्य असू शकेल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी सर्वजण प्रभावित होतील. कीर्तीही वाढेल.
धनु राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन लाभदायक ठरू शकेल. अचानक धनलाभ होऊ शकेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सासरच्या काही नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. परंतु, जोडीदाराचा पाठिंबा तुमच्याबाजून असू शकेल. लव्ह लाइफमध्ये नवीन संबंध प्रस्थापित होऊ शकतील. स्वतःहून कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकाल. यात यश मिळू शकते.
मकर राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन यशकारक ठरू शकेल. व्यापारात प्रगती दिसून येऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. मानसिक शांतता मिळू शकेल. सामाजिक कार्यामुळे सन्मान मिळू शकेल. कौटुंबिक संपत्ती मिळण्याचे योग जुळून येऊ शकतील. पैसा कुठेतरी बराच काळ अडकला असेल तर मिळण्याची शक्यता आहे. अधिक मेहनत करावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कुंभ राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन लाभदायक ठरू शकेल. उच्च शिक्षणाशी संबंधित समस्या दूर होऊ शकेल. व्यापारी वर्गासाठी नफ्याची स्थिती सामान्य राहू शकेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आई-वडिलांचा स्नेह आणि आशीर्वाद मिळू शकेल. त्यांच्या सहकार्याने कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतील. भावंडांसोबत चांगला वेळ जाऊ शकेल. कोणाशीही निरर्थक वाद घालणे टाळा.
मीन राशीच्या व्यक्तींना गुरुदर्शन अनुकूल ठरू शकेल. व्यवसायात येणारे अडथळे दूर होऊ शकतील. मनोरंजनाकडे जास्त लक्ष दिल्याने महत्त्वाचे काम बिघडू शकते, त्यामुळे समतोल राखणे फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रात उत्साहाने कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा भविष्यात नुकसान सहन करावे लागू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.