गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 07:07 AM2024-05-28T07:07:07+5:302024-05-28T07:07:07+5:30

जून महिन्यात होत असलेला गुरुचा उदय काही राशींना शुभलाभदायी, फायदेशीर ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंशांवर असतो, तेव्हा तो ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. पृथ्वीवरून हा ग्रह दिसत नसल्याने या स्थितीला तो ग्रह अस्त पावला, असे समजले जाते. सूर्यापासून दूरच्या अंतरावरून ग्रह मार्गक्रमण करू लागला की, तो ग्रह पृथ्वीवरून दिसतो. त्यामुळे त्या ग्रहाचा उदय झाला, असे सांगितले जाते. जून महिन्यात गुरु ग्रहाचा उदय होणार आहे.

आताच्या घडीला सूर्य आणि गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान आहेत. जून महिन्याच्या मध्यावर सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. तर पुढील सुमारे वर्षभर गुरु वृषभ राशीत असेल. जून महिन्याच्या सुरुवातीलाच नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह उदय होणार आहे.

गुरुचे उदय होणे शुभ मानले जाते. यानंतर शुभ कार्ये करण्यास प्रारंभ केला जाऊ शकतो, असे म्हटले जाते. केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर गुरु उदय होण्याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते. गुरु उदय होण्याचा कोणत्या राशींना फायदा मिळू शकतो. गुरुबळ प्राप्त होऊ शकते, ते जाणून घेऊया...

मेष: गुरु उदय अनुकूल ठरू शकतो. आर्थिक लाभासोबत नशिबाची साथ लाभू शकेल. परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून आर्थिक लाभ मिळू शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. आनंदी जीवन जगता येईल.

वृषभ: गुरु उदय होण्याचा सर्वाधिक लाभ होऊ शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकेल. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. काही चांगली बातमी मिळू शकेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांकडे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत असू शकतात.

कर्क: गुरु उदय लाभदायक ठरू शकतो. व्यवसायात मोठे यश मिळू शकते. आर्थिक लाभही मिळू शकतो. करिअर क्षेत्रात तुम्हाला बढती मिळू शकते. व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत प्राप्त होऊ शकतात. जीवनात सकारात्मक प्रभाव पडू शकतो.

सिंह: गुरु उदय लाभदायक ठरू शकतो. नोकरदारांना सकारात्मक परिणाम मिळतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. बढती मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नफा मिळू शकेल. व्यवसाय वाढवू शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे.

कन्या: नशिबाची साथ मिळू शकते. वरिष्ठांच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल. पैसे वाचविण्यात यशस्वी होऊ शकता. जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. आरोग्यही चांगले राहू शकेल. प्रतिकारशक्तीही चांगली राहू शकेल. दिनचर्येत व्यायाम, योगासने, ध्यानधारणा यांचा समावेश करणे हिताचे ठरू शकते.

वृश्चिक: वैवाहिक जीवनात आनंद राहू शकेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकेल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.