गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:23 PM2024-10-02T12:23:52+5:302024-10-02T12:36:11+5:30

Navratri 2024: गुंतवणुकीतून चांगला परतावा, बोनस, प्रमोशन संधी यांसह कोणत्या राशींना आगामी काळ सर्वोत्तम फलदायक ठरू शकतो? जाणून घ्या...

Navratri 2024: ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. चातुर्मासातील नवरात्रोत्सव सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या आगामी काळात नवग्रहातील दोन महत्त्वाचे ग्रह गोचर करणार आहेत. या दोन्ही ग्रहांचे कुंडलीतील स्थान आणि जीवनावरील प्रभाव विशेष मानला जातो.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी शनी शततारका नक्षत्राच्या पुढील चरणात प्रवेश करत आहे. शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे शश नामक राजयोग जुळून आला आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी होत असलेले शनीचे नक्षत्र गोचर विशेष मानले जात आहे.

तसेच गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान असून, ०९ ऑक्टोबर रोजी वक्री होत आहे. गुरु ग्रहाचे वक्री चलनाने वृषभ राशीतच गोचर करणे विशेष प्रभावकारी मानले जाते. गुरु आणि शनी या दोन ग्रहांच्या या गोचराचा काही राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...

मेष: नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. संपत्तीत वाढ होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोक नफा मिळवू शकतात. समाधान मिळेल. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची योजना आखत असाल तर आवडीचे काम मिळण्याची दाट शक्यता आहे. पैसे वाचवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या प्रयत्नांवर समाधानी राहतील. नवीन प्रकल्प किंवा करार मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ: आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरच्या प्रगतीसह पगार वाढू शकतो. सुख समृद्धी लाभेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरदारांच्या कामाची दखल घेतली जाू शकते. कामाच्या ठिकाणी यशासोबत प्रमोशन मिळू शकते. जीवनात समाधानी वाटू शकते.

मिथुन: नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित काम किंवा अडकलेले पैसे मिळवू शकता. कामाचे कौतुक होईल. यासोबतच व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. देश-विदेशात प्रवासाने अनेक फायदे मिळू शकतात. आर्थिक फायदा मिळू शकतो. करिअरला चालना मिळू शकते. भविष्यासाठी पैसे वाचवू शकाल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकतो.

कर्क: मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सुख-समृद्धी वाढू शकते. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांना गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. आयुष्यात काही नवीन योजना सुरू होऊ शकतात. सोने, चांदी आणि दागिन्यांचे व्यवहार करतात त्यांना सणासुदीच्या काळात चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

सिंह: जीवन आनंदाने भारलेले असू शकेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांतता मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात अपार यशाची अपेक्षा करू शकतात. धैर्य आणि शौर्य वाढेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना विविध सौद्यांमधून मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

तूळ: व्यवसायात भरघोस नफा होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. हा काळ फायदेशीर ठरेल. अनेक अपूर्ण प्रकल्प सुरू होऊ शकतात. भविष्यात मोठा फायदा होईल. व्यावसायिक जीवनात खूप सकारात्मक बदल होतील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी आगामी कालावधी फायदेशीर ठरू शकेल.

धनु: प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जीवनात आनंद येऊ शकतो. गुंतवलेल्या पैशावर चांगला परतावा मिळू शकेल. कार्यक्षेत्रात गुरूच्या कृपेने सर्वजण कामाचा आदर करतील. कामाचा विचार करता काही मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते. भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल.

कुंभ: प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. भरपूर पैसा मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. संपत्तीत वाढ होऊ शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येऊ शकेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. पदोन्नतीसह बोनस आणि वेतनवाढ पूर्ण केली जाऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रात अफाट यश मिळू शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो. उच्च अधिकाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. जीवनात आनंद येऊ शकतो.

मीन: देवी लक्ष्मीची विशेष कृपा असू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडता येतील. जीवनात आनंद येऊ शकतो. व्यवसायात अनेक आव्हाने उभी राहू शकतात. पण यावर सहज मात करण्यास सक्षम असाल. अध्यात्माकडे अधिक कल असेल. जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. मुलांकडूनही आनंद मिळू शकतो.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.