गुरु वक्री: ५ राशींना मान-सन्मान, करिअरमध्ये यश-प्रगती; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, भाग्योदय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 03:00 PM2024-09-03T15:00:03+5:302024-09-03T15:00:03+5:30

काही दिवसांनी गुरु वक्री होणार आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकतो? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांपैकी सर्वच ग्रह नियमित अंतराने राशी गोचर करत असतात. वक्री होत असतात, मार्गी होत असतात. अस्तंगत होत असतात, तर उदय होत असतात. ग्रहांचे गोचर नियमितपणे अखंडितपणे सुरू असते. त्याचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव पाहायला मिळत असतो.

नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह ऑक्टोबर महिन्यात वक्री होणार आहे. विद्यमान घडीला गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. वास्तविक पाहता काही मान्यतांनुसार, गुरु आणि शुक्र एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. परंतु, गुरुचे चलन, वक्री होणे काही राशींना अनुकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

०९ ऑक्टोबर रोजी गुरु वक्री होत आहे. पुढील वर्षीपर्यंत गुरु वक्री अवस्थेत वृषभ राशीत मार्गक्रमण करेल, असे सांगितले जात आहे. याचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकेल. कुटुंब, आर्थिक आघाडी, शिक्षण, करिअर, व्यवसाय, व्यापार या आघाड्यांवर कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल, ते जाणून घेऊया...

मिथुन: गुरु वक्री होणे लाभदायक ठरू शकते. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. नवीन प्रकल्प मिळू शकतील. जीवनात सकारात्मकता येऊ शकेल. नोकरीत चांगल्या संधी मिळतील. अचानक प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे. देश-विदेशात फिरू शकता. मनोकामना पूर्ण होतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

कर्क: गुरु वक्री होणे अनुकूल ठरू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. पैसे वाचवू शकाल. व्यवसायातही अनेक पटींनी फायदे मिळण्याची शक्यता आहे. जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतील. योजना यशस्वी होतील. राजकारणाशी संबंधित असलेल्यांना काही पद मिळू शकते.

कन्या: नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकेल. अडकलेले पैसे अचानक मिळाल्याने अनेक योजना पूर्ण होऊ शकतील. घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काम मेहनतीने पूर्ण करा. लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक: गुरु वक्री होणे लाभदायक ठरू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अनुकूल राहू शकेल. व्यवसाय वाढवण्याची संधी मिळू शकेल. व्यवसायात नफा होऊ शकेल. बौद्धिक क्षमता वाढेल, प्रगती होईल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकेल.

धनु: गुरु वक्री होणे भाग्याचे ठरू शकेल. मान-सन्मान वाढेल. प्रगतीच्या शुभ संधी मिळू शकतील. जीवनातील कोणतीही चांगली बातमी आनंद देईल. व्यवसायात चांगली कमाई केल्यामुळे नफा चांगला होईल. संवाद वाढवून प्रगती साधण्यात यश मिळवू शकाल. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक केले जाईल. लोकप्रियता वाढेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.