Gurupushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. आज वर्षाअखेरीच्या मुहूर्तावर म्हणजेच २८ डिसेंबर रोजी उत्तर रात्री १ वाजून ३ मिनिटांनी सुरू होऊन २९ डिसेंबर रोजी सकाळी ७. १२ पर्यंत हा योग जुळून आला आहे. गुरुवार दत्तगुरूंचा त्यातही तो मार्गशीर्षातला आणि गुरुपुष्यामृत योग माता लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा, त्यामुळे हा योग सहा राशींसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.