Gurupushyamrut Yoga 2024: शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींना फळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 10:33 AM2024-01-24T10:33:40+5:302024-01-24T10:52:57+5:30

Gurupushyamrut Yoga 2024: गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. २५ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र समाप्त होणार असून त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आला आहे. या दिवशी सकाळी ८. १५ पासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी रोजी ७. १६ मिनिटांपर्यंत हा योग असेल.

पौर्णिमा ही देवी लक्ष्मीची तिथी आणि गुरुपुष्यामृत योग हा तिच्या आराधनेचा, अशा योगावर सर्वच राशींनी देवीची पूजा करणे लाभदायी ठरेल. ज्योतिष तज्ञांच्यानुसार हा सुंदर योग पुढील राशींसाठी लाभदायी ठरेल असे म्हटले जात आहे. त्या राशी पुढीलप्रमाणे!

ठरवलेली कामे होतील. तसेच जुनी येणी वसूल होतील. गुरुपुष्यामृत योगावर नवीन वस्तूंची खरेदी करणे शुभ ठरेल. या वस्तू दीर्घकाळ लाभ देतील. लक्ष्मीच्या कृपेने मन शांत राहील आणि नवीन कामाची सुरुवात कराल. पुढील काळ आनंदात जाण्याच्या दृष्टीने शुभ घटना घडतील!

गुरुपुष्यामृत योगावर नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे, जिची तुम्ही दीर्घ काळापासून वाट बघत होतात. ती संधी ओळखा आणि संधीचे सोने करा. नव्या लोकांशी भेटी गाठी होतील व त्या लाभदायक ठरतील.

गुरु पुष्यामृतावर सोने खरेदी करण्याचा प्रघात आहे. तुम्हीसुद्धा या योगावर एक ग्राम का होईना सोने खरेदी अवश्य करा. या योगावर केलेली खरेदी फलदायी ठरते, वृद्धिंन्गत होते. अशी भरभराट व्हावी म्हणून चांगल्या वस्तूची खरेदी जरूर करा!

वृश्चिक राशीसाठी हा योग आनंदादायी ठरेल. आनंद वार्ता समजतील. दत्त कृपेने जुने वाद संपुष्टात येतील. हितशत्रू माघार घेतील. वाहन, यंत्र किंवा अन्य मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हा दिवस लाभदायी ठरेल.

कुंभ राशीला गुरु पुष्यामृत योगावर धनलाभ होण्याचे संकेत आहेत. हा दिवस त्यांच्यासाठी शुभवार्ता आणणाराही ठरू शकेल. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी दूर होतील. लक्ष्मीचे स्तोत्र पठण तुम्हाला इच्छित लाभ करून देईल.

मीन राशीची थांबलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. यशाचे नवे मार्ग खुले होतील. लक्ष्मी स्तोत्र पठणाचा लाभ होईल. या योगावर केलेली कोणतीही खरेदी फायदेशीर ठरेल.