Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा शेअर करत साजरा करा बजरंगबलीचा जन्मोत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 21:08 IST2025-04-11T18:44:52+5:302025-04-11T21:08:35+5:30
Hanuman Jayanti Marathi Wishes: १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2025)आहे. हा उत्सव आपल्या प्रियजनांबरोबर साजरा करताना त्यांना सुंदर आणि अर्थपूर्ण शुभेच्छा संदेश पाठवायला विसरू नका. त्यासाठी पुढे दिलेले श्लोक, मंत्र या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित करतील.

Hanuman Jayanti Wishes in Marathi
हनुमंताच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहे. तो केवळ रामालाच प्रिय नव्हता तर रावणालाही त्याच्या शक्ती, युक्ती आणि भक्तीचं कौतुक वाटलं. एवढेच नाही तर लंका राक्षसिणीला चकवा देणारा हा बुद्धिमान भक्त हनुमान सगळ्यांसाठीच आदर्श योद्धा ठरला. त्याच्या उत्सवाला त्याला साजेसे शुभेच्छा संदेश पाठवूया.
Hanuman Jayanti Wishes in Marathi
ज्याचा वेग वाऱ्यापेक्षा आणि मनापेक्षा जास्त आहे, ज्याने इंद्रियांना जिंकून त्यावर संयम मिळवला आहे, तो पवनपुत्र आणि वानरांचा नेता आहे अशा रामाच्या दूताला आमचा नमस्कार असो.
Hanuman Jayanti Wishes in Marathi
हनुमान या नावातच एवढी ताकद आहे की तुलसीदास लिहितात, रामाचे नाव नंतर, पण नुसत्या हनुमानाचे नाव जरी भक्तिभावाने घेतले, मनापासून स्मरण केले, तरी येणारे संकट परस्पर पळून जाईल.
अंजनी मातेचा पुत्र आणि वायूचा आशीर्वाद मिळालेला हनुमान त्याला या गायत्री मंत्राद्वारे नमस्कार असो. हनुमान जन्मोत्सवाला या माता आणि पुत्राचे स्मरण करून आपणही पावन होऊया.
रामभक्त अशी ज्याची ओळख आहे, जो सगळ्या वानर सेनेचा प्रमुख आहे अशा हनुमंताला आमचा नमस्कार असो. त्याच्या नेतृत्त्वाचे गुण आपणही अंगात बाणूया आणि आपल्याजवळ असलेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक शक्तीचा गैरवापर न करता आपली सर्व शक्ती रामचरणी अर्पण करूया.
रामाकडे होती तेवढीच ताकद हनुमानाकडे होती, तोही तेवढाच कीर्तिमान, धैर्यवान, गुणवान, बुद्धिमान होता, तरी त्याने स्वतःच्या गुणांवर अहंकार न करता श्रीरामाचे दास्यत्त्व पत्करण्यात धन्यता मानली आणि त्यांचा सेवक बनून राहिला, अशा हनुमंताला नमस्कार.