Holi 2022 : राहू संक्रमणामुळे उजळणार 'या' पाच राशींचे भाग्य; आयुष्यात भरतील नवे रंग! By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:42 PM 2022-03-17T12:42:02+5:30 2022-03-17T12:53:57+5:30
Holi 2022 : १७ मार्च रोजी राहूचे संक्रमण होऊन त्याने मेष राशीत प्रवेश केला आहे. हे संक्रमण १८ महिन्यांनंतर झाले आहे. राहू आणि केतू असे ग्रह आहेत जे नेहमी उलट फिरतात. राहू वृषभ सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी होलिका दहनाच्या दिवशी राहू राशी बदलत आहे. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी राहूचे संक्रमण खूप शुभ ठरणार आहे. शनि नंतर राहु हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. त्याच्या संथ परिक्रमेचा परिणाम आपल्या राशींवर होतो. त्यामुळे राहुचा वाढलेला मुक्काम आपल्या कार्याची तसेच भाग्योदयाची गती लांबवतो. यासाठी त्याचे आपल्या राशीतून पुढच्या राशीत जाणे हितावह ठरते. म्हणून होळीनिमित्त राहूचे संक्रमण पाच राशींना लाभदायक ठरेल तसेच आयुष्यात नवे रंग भरेल.
मिथुन : राहूच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. धनलाभ होईल. पदोन्नती मिळू शकते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल.
कर्क : राहुच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होइल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कमाईही साधने वाढतील. पदोन्नती मिळू शकते. गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल.
वृश्चिक : राहूचा मेष राशीत प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरेल. त्यांना बढती-वाढ मिळू शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. तुम्ही भरपूर पैसे कमवाल आणि चांगली बचत देखील करू शकाल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण खूप शुभ राहील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा मोठे यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होईल. रखडलेले पैसे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
मीन : मीन राशीच्या लोकांना राहुचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. त्यांचे उत्पन्न देखील वाढू शकते आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मोठमोठी कामेही केवळ छोट्या शब्दावर करता येतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल.